Image For Representation (Photo Credits: Facebook)

Spy Cameras in Bathroom and Bedroom: पुण्यातील (Pune) एका महिला डॉक्टरच्या (Women Docter) बाथरूम आणि बेडरूममध्ये छुपे कॅमेरे लावण्यात आल्याची घटना 8 जुलै रोजी उघडकीस आली होती. याप्रकरणी संबंधित महिला डॉक्टरने तक्रार दाखल केल्यानंतर अवघ्या पाच दिवसात पोलिसांनी आरोपीचा शोध लावला आहे. यामागे एक प्रसिद्ध डॉक्टर असून पोलिसांनी त्याला बेडल्या ठोकल्या आहेत. आरोपीने एकतर्फी प्रेमातून हा उद्योग केल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिला डॉक्टर भारती विद्यापीठ कॅम्पस परिसरात असणाऱ्या डॉक्टर्स कॉर्टरमध्ये राहतात. दरम्यान, त्या 6 जुलै रोजी कामावरून घरी परतल्यानंतर त्यांना घरातील वातावरण संशयास्पद वाटले. त्यानंतर त्यांनी घराची पाहणी केली असता त्यांना बाथरूममध्ये आणि बेडरूममध्ये छुपे कॅमेर लावण्यात आल्याचे निदर्शनास आले. त्यांनंतर त्यांनी 8 जुलै रोजी भारती विद्यापीठ पोलिसांत अज्ञात व्यक्तीविरोधात तक्रार दाखल केली. हे देखील वाचा- Women, Boobs And Bras: 'बाई, बुब्स आणि ब्रा', अभिनेत्री हेमांगी कवी काही सांगू पाहते आहे; कलाकार-नेटीझन्सकडून पाठिंबा अन कौतुकही

पीडित डॉक्टरांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी कसून चौकशीला सुरुवात केली. दरम्यान, पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता, यामागे पुण्यातील एक प्रसिद्ध डॉक्टर असल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसून आले. त्यानंतर पोलिसांनी संबंधित डॉक्टरचे पितळ उघडे पाडून त्याला गजाआड केले आहे.

आरोपी डॉक्टर हा एम डी असून न्युरोलोजी स्पेशालिस्ट आहे. तसेच शहराच्या मध्यवर्ती भागात त्याचे स्वत:चे क्लिनिक देखील आहे, अशी माहिती पोलीस चौकशीतून समोर आली आहे. यासंदर्भात पीटीआयने वृत्त दिले आहे.