सध्या अनेक ठिकाणी पाळीव आणि भटक्या कुत्र्यांनाही अनेकजण कंटाळले आहेत. भटके कुत्रे अचानक हल्ले करत असल्याचे प्रकार समोर आले आहेत. पुण्यात शेजार्यांचा कुत्रा सारखा भुंकत असल्याने त्रास झाल्याने हडपसर (Hadapsar) मध्ये एकाने रागाच्या भरात कुत्र्यावर स्पोर्टगन (Sportsgun) मधून गोळीबार केल्याचं समोर आलं आहे. कुत्र्याच्या मालकाने या हल्ल्यानंतर पोलिसांत तक्रार केली असून गोळीबार करणार्या अली रियाज थावेर वर गुन्हा दाखल केला आहे.
हडपसर पोलिस स्टेशन मध्ये 'इंक्लेव्ह लोकमंगल सोसायटी' च्या झेड कॉर्नर मांजरी बुद्रुक येथे ही घटना घडली आहे. कुत्रा त्रास देत असल्याच्या रागामध्ये एअरगनचा वापर करून त्याला जखमी केले. हा प्रकार पाहून कुत्र्याचा मालक थेट पोलिस स्टेशन मध्ये पोहचला. त्याच्या तक्रारीवरून कारवाई करत पोलिसांनी आरोपीला अटक केली अअहे.
तक्रारदार व्यक्तीचं नाव प्रीती विकास अग्रवाल आहे. अग्रवाल यांनी एक कुत्रा पाळलेला होता. त्यांच्याकडे बाऊंसी नावाचा कुत्रा होता. 21 नोव्हेंबरच्या रात्री 11 च्या सुमारास तो सोसायटी समोरील रस्त्यावर बसला होता. ती वेळ साधत अलीने गोळीबार केला. कुत्र्याला त्याची गंभीर दुखापत झाली. मुक्या प्राण्यांना पुण्यामध्ये विचित्र पद्धतीने त्रास दिला जात असल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. यामध्ये एकाचा गळफास लागून मृत्यू झाल्याचा तर का कुत्र्याला मारहाण करुन विष देऊन ठार मारल्याची धक्कादायक घटना समोर आली होती.