भाजप नेते (BJP Leader) किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांचा कथित व्हिडीओ व्हायरल होत आहे. राज्याच्या राजकारणात यामुळे सध्या खळबळ माजली आहे. भारतीय जनता पक्षाचे (BJP) ज्येष्ठ नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांचा कथित व्हिडिओ लीक झाला आहे. एका मराठी वृत्तवाहिनीने याबाबत वृत्त दिले आहे. या व्हिडिओचा मुद्दा सध्या पावसाळी अधिवेशनामध्ये चांगला गाजत आहे. या मुद्द्यावरुन विधानपरिषदेमध्ये विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत. यावर प्रतिक्रिया देताना विधानपरिषद अध्यक्षा निलम गोऱ्हे (Nilam Gorhe) यांनी 'हा व्हिडिओ बघणं माझ्यासाठी खूप कठीण परीक्षा.' असल्याचे मत व्यक्त केले आहे. (हेही वाचा - Devendra Fadnavis On Kirit Somaiya Viral Video: किरीट सोमय्या व्हायरल व्हिडीओ प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल- देवेंद्र फडणवीस यांची माहिती)
विधानपरिषदेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी किरीट सोमय्यांच्या कथित व्हिडीओचा मुद्दा मांडला. यावेळी त्यांनी अध्यक्षांना या व्हिडिओचा पेन ड्राईव्ह देखील दिला. हा मुद्दा मांडल्यानंतर राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उच्च आणि सखोल स्तरावर चौकशी होईल अशी घोषणा केली. त्यानंतर या मुद्द्यावर बोलताना निलम गोऱ्हे यांनी सांगितले की, 'हा मुद्दा खूपच अस्वस्थ करणार आहे. चॅनेलवर घराघरामध्ये हे संपूर्ण शॉर्ट दाखवले जातात. घरातील मुलं- मुली आणि बाकीची लोकं असतात. त्यांच्यासमोर हे असे शॉर्ट वारंवार दाखवले जातात. त्यामुळे मी विनंती करते की आपल्याकडे येणारे व्हिडिओ ब्लर करा. असले व्हिडिओ दाखवताना थोडेफार बंधन ठेवा.'