Rupali Chakankar criticizes Chandrakant Patil (Photo Credit: FB/ Twitter)

महाराष्ट्रातील (Maharashtra) अगामी निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर राज्यात आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहे. याचपार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर निशाणा साधला होता. “शरद पवार यांनी मराठा आरक्षण आणि ओबीसींच्या राजकीय आरक्षणावर केलेले भाष्य मतीगुंग करणारे आहे. ‘खोटे बोल पण रेटून बोल’ अशी पवार यांची प्रवृत्ती आहे.”, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. या टिकेला राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी जोरदार प्रत्त्युत्तर दिले आहे. चंद्रकांत दादा आपले जितके वय नाही, तेवढी शरद पवार यांची कारकिर्द आहे, अशा शब्दात रुपाली चाकणकर यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर टिकास्त्र सोडले आहे.

रुपाली चाकणकर यांनी ट्विट माध्यमातून एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात त्यांनी म्हटले आहे की, राज्यात गेल्या दीड वर्षांपासून राज्यपाल नियुक्त आमदारांची निवड रखडली आहे. राज्य सरकार आपल्या अधिकारानुसार काही आमदारांची यादी राज्यपाल्यांकडे देतात. राष्ट्रीय शिष्टाचारानुसार राज्यपाल ती नाव मान्य करतात. मात्र, राज्यात आपली सत्ता नसल्याने केंद्र सरकार राज्यपालांना हाताशी धरुन अडवणूक करीत आहे. त्यामुळे राज्याचे हित लक्षात घेता. यावरून शरद पवार यांनी राज्यपालांचे वय झाले असून वयोमानानुसार लक्षात राहत नसल्याचे वक्तव्य केले आहे, असे रुपाली चाकणकर यांनी म्हटले आहेत. तसेच राज्यातील राजपालनियुक्त आमदारांच्या नियुक्त्या का रखडल्या आहेत, असाही प्रश्न त्यांनी खालील व्हिडिओत उपस्थित केला आहे. हे देखील वाचा- Bank Fraud Case प्रकरणी कर्नाळा बँकेचे माजी अध्यक्ष विवेकानंद शंकर पाटील यांची ED कडून 234 कोंटींची स्थावर संपत्ती जप्त

रुपाली चाकणकर यांचे ट्वीट-

चंद्रकांत पाटील काय म्हणाले?

राष्ट्रावादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे भाष्य ऐकून मती गुंग झाली आहे. 'राज्यपालांचे वय झाले आहे, त्यामुळे त्यांना विसर पडला असेल, मग पवारांचे वय झाले नाही का? कशाला वयाचा मुद्दा काढता? खोटं बोला पण रेटून बोला, याची प्रचिती आज झाली आहे, असे चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.