छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी नामोल्लेख केल्याप्रकरणी KBC विरोधात राष्ट्रवादीचा निषेध मोर्चा
NCP Protest Against Sony (PC - NCP Twitter)

सोनी वाहिनीवर ‘कौन बनेगा करोडपती’ (Kaun Banega Crorepati) या कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Shivaji Maharaj) नावाचा नामोल्लेख एकेरी केल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) आक्रमक भूमिका घेतली आहे. राष्ट्रवादीकडून आज दुपारी १२ वाजता मालाड येथील ‘सोनी’ (Sony) वाहिनीच्या कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. राष्ट्रवादीने केलेल्या आंदोलनाला अखेरशेवटी यश आलं आहे. सोनी वाहिनेने अधिकृतरित्या संपूर्ण महाराष्ट्र माफी मागितले आहे.

या शोच्या एका एपिसोडमध्ये गुजरातच्या शाहेदा चंद्रन या हॉटसीटवर बसल्या होत्या. त्यांना विचारण्यात आलेल्या एका प्रश्नाच्या पर्यायांमध्ये शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला गेला. ‘यापैकी कोणता शासक मुघल सम्राट औरंगजेबचा समकालीन होता?’ असा प्रश्न विचारण्यात आला. त्यासाठी चार पर्याय देण्यात आले. त्यात शिवाजी महाराजांचा उल्लेख एकेरी नावाने करण्यात आला होता.

(हेही वाचा - आमदारांची खरेदी विक्रीची माहिती खोटी: कॉंग्रेससने 48 तासांमध्ये पुरावे द्यावेत अथवा माफी मागा: सुधीर मुनगंटीवार यांची मागणी)

राष्ट्रवादी काँग्रेस अधिकृत ट्विट - 

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष आमदार नवाब मलिक यांनी सोनी कार्यालयावर धडक मोर्चा काढणार असल्याचे सांगितले होते. तसेच राष्ट्रवादीचे नेत आणि माजी विरोधी पक्षनेत धनंजय मुंडे यांनीदेखील ट्विट करत सोनी वाहिनीने संपूर्ण महाराष्ट्राची माफी मागावी, असे आवाहन केले होते.

सोशल मीडियावरदेखील शिवाजी महाराजांचे एकेरी नाव घेतल्यामुळे #Boycott_KBC_SonyTv असा ट्रेंड सुरु आहे. या हॅशटॅगमार्फत सोनी वाहिनीवर जोरदार टीका होत आहे. सोनी वाहिनीवरील ‘कौन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमात छत्रपती शिवरायांचा एकेरी उल्लेख करण्यात आल्याने मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली होती. याचा निषेध म्हणून आज मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने यासंदर्भात निषेध करण्यासाठी आज सोनी पिक्चर्स नेटवर्कच्या मालाड येथील कार्यालयासमोर आंदोलन केले. या आंदोलनाला अखेर यश आले असून आज सोनी वाहिनीने आपला माफीनामा सादर केला आहे.