राष्ट्रवादी (NCP) नेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्या या बंडखोरीनंतर पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी त्यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. मुंबईत झालेल्या त्यांच्या गटनेत्यांच्या बैठकीत शरद पवार म्हणाले की, ‘अजित पवारांना काही अडचण असेल तर त्यांनी माझ्याशी बोलायला हवे होते. त्यांच्या मनात काही असेल तर ते माझ्याशी संपर्क साधू शकतात. अजित पवार गटाने कोणतीही प्रक्रिया पाळली नाही. आज अजित जे बोलला ते ऐकून वाईट वाटले.’
ते पुढे म्हणाले, ‘तुम्ही ज्या विचारसरणीला विरोध केलात त्या विचारसरणीसोबत जाणे योग्य नाही. ज्या आमदारांनी दूर जाण्याचा निर्णय घेतला त्यांनी आम्हाला विश्वासात घेतले नाही. तसेच आमचे निवडणूक चिन्ह कुठेही जाणार नाही आणि आम्ही ते कुठेही जाऊ देणार नाही. त्यांचे नाणे खणकन वाजत नाही, त्यांना ते माहिती आहे, त्यामुळेच ते माझे फोटो वापरत आहेत. ज्यांनी आम्हाला सत्तेत आणले ती जनता आणि कार्यकर्ते आमच्यासोबत आहेत. मी सत्तेत नक्कीच नाही, पण मी माझ्या लोकांमध्ये आणि राज्यातील जनतेमध्ये आहे. ते आमच्यासोबत आहेत.’
#WATCH | "...I think this enthusiasm of workers will help our MLAs & MPs get elected in the time to come," says Sharad Pawar loyalist NCP MLC Eknath Khadse
"We can definitely win. When BJP can go from two to 300, why can't we do it?" he says when asked if they have enough… pic.twitter.com/xNknnFpDxG
— ANI (@ANI) July 5, 2023
#WATCH | Sharad Pawar loyalist, NCP MLA Rohit Pawar says, "When we entered politics in 2019 and contested the Vidhan Sabha election, Pawar Saheb was 82. Most of us were elected due to him. So, I don't think age matters much."
"It is not as if existing MLAs alone are needed to… https://t.co/5SqwlHwUWM pic.twitter.com/TLPxDRJYkN
— ANI (@ANI) July 5, 2023
या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना राष्ट्रदीच्या अनेक नेत्यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. आमदार एकनाथ खडसे म्हणाले, ‘कार्यकर्त्यांचा हा उत्साह आगामी काळात आमदार आणि खासदारांना निवडून आणण्यास मदत करेल, असे मला वाटते. आम्ही नक्कीच जिंकू शकतो. जेव्हा भाजप दोन वरून 300 पर्यंत जाऊ शकतो, तर आम्ही ते का करू शकत नाही?’.
#WATCH | "What he has said today is the truth," asserts Jayant Patil on NCP President Sharad Pawar's claim that the party symbol is with him.#Maharashtra pic.twitter.com/I3FORTLWdW
— ANI (@ANI) July 5, 2023
राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार म्हणतात, ‘आम्ही 2019 मध्ये विधानसभा निवडणूक लढवली तेव्हा पवार साहेब 82 वर्षांचे होते. आमच्यापैकी बहुतेक जण त्यांच्यामुळेच निवडून आले होते. त्यामुळे मला वयाचे फारसे महत्त्व वाटत नाही. निवडणूक जिंकण्यासाठी एकट्या विद्यमान आमदारांची गरज आहे असे नाही, त्यासाठी उमेदवारांची गरज आहे. पक्ष नेत्यांमुळे नाही तर कार्यकर्ते आणि विचारांनी चालतो. सध्याच्या घटनांमुळे अनेकांना संधी आणि बळ मिळू शकते.’ (हेही वाचा: Maharashtra Political Crisis: निवडणूक आयोगापर्यंत पोहोचला राष्ट्रवादी काँग्रेसचा राजकीय संघर्ष; Ajit Pawar आणि Sharad Pawar यांनी दाखल केली याचिका, जाणून घ्या सविस्तर)
#WATCH | "82 saal ka sher abhi bhi zinda hai," says Sharad Pawar loyalist Anil Deshmukh on Ajit Pawar's "retirement" remark for Sharad Pawar https://t.co/5SqwlHwUWM pic.twitter.com/gaj7tDQJyP
— ANI (@ANI) July 5, 2023
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पक्षाचे चिन्ह त्यांच्याकडे असल्याच्या दाव्यावर, ‘ते आज जे बोलले तेच सत्य आहे,' असे प्रतिपादन जयंत पाटील यांनी केले. अजित पवारांच्या शरद पवारांबद्दलच्या ‘निवृत्ती’ टीकेवर, ‘82 साल का शेर अभी भी जिंदा है,’ असे शरद पवारांचे निष्ठावंत अनिल देशमुख यांनी म्हटले.