NCP Party Manifesto: राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा (NCP) जाहीरनामा (Manifesto) प्रसिद्ध केला, ज्यामध्ये राज्य, देश आणि कामगार यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्याचे आश्वासन दिले आहे. 'राष्ट्रासाठी राष्ट्रवादी' या थीमवर आधारित जाहीरनामा, सार्वजनिक सेवा आणि पायाभूत सुविधांच्या विकासाद्वारे आर्थिक प्रगतीसाठी पक्षाची भूमिका आणि संकल्प स्पष्ट करतो. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जाहीरनामा तयार करण्यात आला आहे. अजित पवार यांनी पक्षाचा दूरगामी जाहीरनामा तयार केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन व आभार मानले.
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी पाठपुरावा, यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न, शेतकऱ्यांना एमएसपी मिळणे, पर्यावरण संतुलन राखण्यासाठी अपारंपरिक उर्जा स्त्रोताला चालना देणे आणि त्यावर अंकुश ठेवणे, जागतिक तापमानवाढीचे संकट, कृषी पीक विमा योजनेची व्याप्ती वाढवणे, शेतकरी सन्मान निधीत वाढ, मुद्रा कर्ज योजनेतील मर्यादा वाढ, जातनिहाय जनगणना, वनक्षेत्रातील जलसाठे, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारताचे स्थायी सदस्यत्व असे स्थानिक ते जागतिक स्तरापर्यंतचे सर्व महत्त्वाचे मुद्दे जाहीरनाम्यात मांडण्यात आले आहेत.
लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जाहीरनामा प्रकाशित करण्यात आला. 'राष्ट्रासाठी राष्ट्रवादी' या संकल्पनेवर हा जाहीरनामा आधारित आहे. विकसित भारताची भूमिका स्पष्ट करणारा हा जाहीरनामा आहे. सार्वजनिक सेवा, पायाभूत प्रकल्प व सुविधा, आर्थिक प्रगती संदर्भातील… pic.twitter.com/Uwmu9IbFvc
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) April 22, 2024
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा लोकसभा निवडणूक जाहीरनामा २०२४@AjitPawarSpeaks @praful_patel @SunilTatkare #NCP #LokSabhaElections2024 #जाहीरनामा #राष्ट्रासाठी_राष्ट्रवादी #लोकसभानिवडणूकजाहीरनामा pic.twitter.com/yVlzpEavp2
— MahaNCPspeaks (@mahancpspeaks) April 22, 2024
जाणून घ्या जाहीरनाम्यातील मुद्दे-
- आत्मनिर्भर भारत हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा संकल्प
- महाराष्ट्राला कौशल्य विकासाची राजधानी बनवण्यास प्रयत्न करणार.
- विश्वकर्मा योजनेची व्याप्ती वाढवून बारा बलुतेदार वर्गासाठी कौशल्य विकासाच्या आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित उद्योग वाढीचे प्रयत्न करणार.
- कौशल्य विकास प्रशिक्षित युवकांना खासगी कंपन्यांत कंत्राटी म्हणून मिळत असलेल्या मानधनात वाढ करून दरमहा 20 हजार रु. करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस प्रयत्नशील राहिल.
- महाराष्ट्र राज्य विकसित भारताच्या प्रगतीचा मुख्य स्रोत राहिल यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कटिबद्ध आहे.
- भारत 5 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था होण्याच्या दिशेने झेप घेत आहे. यात महाराष्ट्र 1 ट्रिलियन डॉलरचा सिंहाचा वाटा उचलेल.
- महाराष्ट्र राज्य वस्तू व सेवा कर संकलनात पहिल्या क्रमांकावर आहे. राज्याचे आर्थिक उत्पन्न आणखी वाढवून देशाच्या आर्थिक प्रगतीत महाराष्ट्राचं योगदान सर्वश्रेष्ठ असण्यावर भर.
- सध्या मुद्रा योजनेतून 10 लाख रु. पर्यंतचे कर्ज मिळते. यात वाढ करून 20 लाख रु. पर्यंत कर्ज उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न करणार.
- राज्यात देशी-विदेशी गुंतवणुकीला चालना देऊन 'हाताला काम आणि प्रत्येक परिवाराला दाम' हा संकल्प.
- खादी आणि ग्रामोद्योगासह वस्त्रोद्योगाला सक्षम तंत्रज्ञानाची जोड देऊन सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगांची उभारणी आणि उद्योगांना चालना देऊन शाश्वत कर्ज पुरवठा आणि बाजारपेठ उपलब्ध होण्यावर कटाक्ष.
- रोजगारनिर्मिती करणाऱ्या उद्योजकांना आर्थिक स्वावलंबन आणि दीर्घकालीन उत्पादन निर्मितीची हमी लाभेल अशा धोरणांवर भर देणार. (हेही वाचा: Lok Shabha Elections 2024: मतदानाचा हक्क बजाविण्यासाठी मतदार यादीत नाव असणे आवश्यक; 23 एप्रिलपर्यंत करता येणार नावनोंदणी, जाणून घ्या सविस्तर)
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा लोकसभा निवडणूक जाहीरनामा २०२४.@AjitPawarSpeaks @praful_patel @SunilTatkare #NCP #LokSabhaElections2024 #जाहीरनामा #राष्ट्रासाठी_राष्ट्रवादी #लोकसभानिवडणूकजाहीरनामा pic.twitter.com/FPMctdRt9E
— MahaNCPspeaks (@mahancpspeaks) April 22, 2024
'स्वावलंबी शेतकरी संपन्न शेतकरी' #NCP #LokSabhaElections2024 #जाहीरनामा #राष्ट्रासाठी_राष्ट्रवादी #लोकसभानिवडणूकजाहीरनामा @AjitPawarSpeaks @praful_patel @SunilTatkare pic.twitter.com/naYXCjGieN
— MahaNCPspeaks (@mahancpspeaks) April 22, 2024
दरम्यान, जाहीरनामा मांडताना अजित पवार म्हणाले, ‘आम्ही पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली महायुती म्हणून लोकसभा निवडणूक लढवत आहोत आणि आमचा मोठा विजय निश्चित आहे. मोदीजींनी तिसऱ्यांदा पंतप्रधान व्हावे, असे आमचे जनतेला आवाहन आहे. अनेक लोक त्यांच्याकडे पाहतात आणि एनडीएचे ते एक मजबूत चेहरा आहेत. मोदींच्या विरोधात भूमिका मांडणारा सक्षम चेहरा विरोधी पक्षात नाही.’
ते पुढे म्हणाले, आरोग्य, शिक्षण, स्वच्छता, पर्यावरण आणि रोजगार ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ग्रामविकासाची पंचसूत्री असून त्या दृष्टिकोनातून आम्ही सर्व काम करीत आहोत. यंदाची लोकसभा निवडणूक देशाचे पंतप्रधान मा.श्री. नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली लढत असून त्यांना पाठबळ देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. 'सबका साथ, सबका विकास, सबका प्रयास, सबका विश्वास', यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची श्रद्धा आहे. याच भूमिकेतून 'राष्ट्राचा विकास, राष्ट्राचा विश्वास आणि राष्ट्राची साथ', या त्रिसूत्रीसाठी यंदाची लोकसभा निवडणूक महत्त्वाची आहे.'