Daulat Daroda And Nitin Pawar (Photo Credits: Facebook)

राज्यातील राजकारणात सुरु असणाऱ्या एका मागोमाग एक धक्कादायक घडामोडींच्या मध्यात प्रत्येक पक्ष आपले आमदार फुटून भाजपला मिळू नयेत या प्रयत्नात आहे. मात्र अशातच राष्ट्रवादीचे (NCP) दोन शहापूरचे आमदार दौलत दरोडा (Daulat Daroda) आणि नाशिकचे नितीन पवार (Nitin Pawar) हे काल पासून बेपत्ता असल्याचे समजतेय. दौलत दरोडा यांचा शोध घेण्यासाठी शहापूर पोलिसांकडे रीतसर तक्रार नोंदवण्यात आली आहे. काल त्यांचे पुत्र करण दरोडा यांनी वडिलांच्या बेपत्ता होण्याची तक्रार केली होती, मात्र प्रसारमाध्यमांच्या माहितीनुसार, दौलत हे काल दिल्लीत जात असतानाचा फोटो अनेक ठिकाणी व्हायरल झाला होता, त्यामुळे नेमके त्यांचे अपहरण झाले आहे, ते स्वतःच बेपत्ता आहेत की यामागे काही वेगळे कारण आहे याबाबत अद्याप स्पष्टता नाहीये. Maharashtra Government Formation Live Update: राज्यात फोडाफोडीचे राजकरण करण्यासाठी 30 नोव्हेंबर पर्यंत भाजपला वेळ- संजय राऊत

तर, दुसरीकडे आमदार नितीन पवार हे शनिवार पासून बेपत्ता आहेत. घरातून निघताना पक्षाच्या बैठकीला जात असल्याचे सांगून गेले ते परत आलेच नाही. तसेच त्यांच्याशी घरच्यांचा संपर्कही होत नाही. त्यामुळे त्यांच्या मुलाने पंचवटी पोलिस ठाण्यात ते बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली आहे.

ANI ट्विट

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल राजभवनात आपापल्या पदाची शपथ घेतली असली तरी. यावेळी अजित पवार यांनी आपल्याला राष्ट्रवादीच्या 22 आमदारांचा पाठिंबा असल्याची निश्चिती दर्शवली होती, मात्र त्यानंतर पक्षाकडून अजित यांच्यासोबत केवळ 2 ते 4 आमदार असण्याची शक्यता सांगण्यात आली. या गोंधळामुळे बहुमत सिद्ध करण्यात अजूनही भाजप यशस्वी झालेले नाही, राज्यपाल कोश्यारी यांच्याकडून 30 नोव्हेंबर पर्यंतची भाजपाला मुदतवाढ देण्यात आली आहे, त्यामुळे याआधी 145 चा मॅजिक आकडा जमा करण्याचे मोठे काम भाजपावर आहे.

या एकूणच वातावरणात फोडाफोडीचे राजकारण होण्याची पूर्ण शक्यता आहे त्यामुळे प्रत्येक पक्ष आपापले आमदार जपून ठेवण्याचा प्रयत्न करत आहे, जर का यामध्ये अन्य पक्षांना यश आले तर भाजपाला बहुमत चाचणीतच मोठा धक्का बसू शकतो.