Jayant Patil Slams BJP-Shivsena Allianace In Zingat Style (Photo Credits: File Image)

विधानसभा पावसाळी अधिवेशनात (Assembly Monsoon Session) राष्ट्रवादीचे (NCP) प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील (Jayant Patil) यांनी भाजपा-शिवसेना युतीला हटके शैलीत टोला लगावला. अर्थसंकल्पाच्या चर्चेत बोलत असताना पाटील यांनी सैराट (Sairat) मधील झिंगाट या गाण्याचे विडंबन करून सत्ताधाऱ्यांवर टीका केली. यामध्ये त्यांनी युतीला आपल्या विजयावर स्वतःच विश्वास बसत नसल्याने असा अशक्य अर्थसंकल्प मांडायची वेळ आली असे म्हंटले होते . लोकसभेच्या कालावधीत भाजपात प्रवेश घेतलेल्या विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil)  यांच्यावर सुद्धा त्यांनी खास भाष्य केले. याशिवाय विधानसभेत युतीला पराभवाची चिंता करण्याची गरज नाही मशीनचा घोटाळा तुमच्या सोबत आहे, असा उपहासात्मक विश्वास त्यांनी आपल्या या विडंबन गीतातून व्यक्त केला. महाराष्ट्र राज्य पावसाळी अधिवेशन  सुरु; भाजप - शिवसेना युती सरकारकारला घेरण्यासठी विरोधकांची रणनिती पक्की)

पाहा जयंत पाटीलांचं झिंगाट व्हर्जन

जयंत पाटील यांनी आपल्या बोलण्यातून, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantivar) यांना निशाणा केले होते. यंदा सरकारने 20 हजार 292 कोटी रुपये महसुली तुटीचा अर्थसंकल्प सादर केला आहे. यावर बोलताना "सुधीर भाऊ,तुम्ही यंदा सर्वात मोठा महसुली तुटीचा अर्थसंकल्प मांडून आपले नाव इतिहासात नोंदवले आहे, त्यामुळे आपल्या सह इतर आमदारांना तुम्ही पार्टी द्यायला हवी" असा शाब्दिक चिमटा पाटील यांनी घेतला होता.Maharashtra Budget 2019: महाराष्ट्र अर्थसंकल्प 2019 मध्ये सरकारने केल्या 'या' महत्त्वाच्या घोषणा

जयंत पाटील ट्विट

याशिवाय गेल्या पाच वर्षांत किती नवीन सरकारी नोकऱ्या निर्माण झाल्या? शिक्षण पूर्ण केलेल्या किती तरुणांना नोकऱ्या मिळाल्या? पाच वर्षांत किती नवीन नोकऱ्या निर्माण झाल्या? पेट्रोल डिझेलचे दर का कमी झाले नाहीत? महाराष्ट्रात किती नवीन उद्योग सुरु झाले? महागाई का कमी झाली नाही? असे अनेक प्रश्न सुद्धा त्यांनी सत्ताधाऱ्यांना विचारले.

जयंत पाटील ट्विट

दरम्यान सध्या सादर केलेला अर्थसंकल्प हा प्रत्यक्ष शक्य नसला तरी केवळ निवडणुकांचा सण डोळ्यासमोर ठेवून विनाकारण फुगवल्याचा आरोप जयंत पाटलांनी केला होता.