प्रकृती अस्वस्थतेमुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर रुग्णालयात दाखल
Rupali Chakankar (PC - Facebook)

प्रकृती अस्वस्थतेमुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांना पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. प्राप्त माहितीनुसार, गेल्या 8 दिवसांपासून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. परंतु, आज त्यांच्या प्रकृतीत अस्वस्थता जाणवल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

काही दिवसांपूर्वी रुपाली चाकणकर यांची कोरोनाची चाचणी करण्यात आली होती. मात्र, त्यांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती त्यांच्या कुटुंबियाने दिली आहे. (हेही वाचा - Coronavirus Update In Maharashtra: महाराष्ट्रात कोरोना विषाणूचा कहर सुरुच; दिवसभरात 9 हजार 518 रुग्णांची नोंद, 258 जणांचा मृत्यू)

प्राप्त माहितीनुसार, रुपाली चाकणकर यांनी काही दिवसांपूर्वी जालना दौरा केला होता. त्यानंतर काही दिवसानंतर त्यांना शारीरिक थकवा जाणवत होता. त्यामुळे त्यांना उपचारासाठी सिंहगड रस्त्यावरील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु, आज त्यांना प्रकृती अस्थिरतेमुळे शनिवारी उशिरा रुबी हॉल क्लिनिक येथे हलवण्यात आले.