NCP Foundation Day: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना होऊन आज 25 वर्षे पूर्ण झाली आहेत. 10 जून 1999 मध्ये शरद पवार यांनी काँग्रेसमधून बाहेर पडत राष्ट्रवादी काँग्रेस या वेगळ्या पक्षाची स्थापना केली होती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 25 व्या वर्धापनदिनानिमित्त आज अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले आहे. शरद पवार गटाकडून अहमदनगरमध्ये भव्य सभेचे आयोजन करण्यात आले आहे. तर, अजित पवार आज मुंबईत जोरदार शक्तीप्रदर्शन करणार आहेत. शरद पवार यांच्या कन्या आणि बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ही राष्ट्रवादीच्या रौप्यमहोत्सवी वर्धापनदिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत.
शरद पवारांची सभा
राष्ट्रवादीच्या रौप्यमहोत्सवी वर्धापनदिनानिमित्त अहमदनगरमध्ये शरद पवार गटाकडून जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेला स्वतः शरद पवारांसह इतर नेते संबोधित करणार आहेत. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी पक्षाने घवघवीत यश मिळवले. शरद पवार यांनी त्यांचे 8 खासदार निवडून आणले. या घवघवीत यशानंतर शरद पवार आज काय बोलणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सुप्रिया सुळे यांची पोस्ट-
आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष - शरदचंद्र पवार या पक्षाचा आज २५ वा वर्धापनदिन. आदरणीय पवार साहेबांनी स्थापन केलेल्या आपल्या या पक्षाने अनेक उतार-चढाव पाहिले. या काळात आपण सर्वजण आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वावर ठाम विश्वास ठेवून सोबत चालत राहिलात, याबद्दल आपले मनापासून आभार.… pic.twitter.com/Pkp4npFQZ5
— Supriya Sule (@supriya_sule) June 10, 2024
अजित पवार गटाचा मेळावा
राष्ट्रवादी अजित पवार गटाकडूनही पक्षाचा 25 वा वर्धापन दिन मुंबईमध्ये साजरा केला जाणार आहे. सायन येथील क्षमुखानंद हॉलमध्ये होणाऱ्या या कार्यक्रमाची अजित पवार गटाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकांमधील मोठ्या पराभवानंतर वर्धापन दिनानिम्मित आयोजित करण्यात आलेल्याय मेळाव्यात अजित पवार काय बोलणार? निवडणूकीतील पराभवाची नाराजी व्यक्त करणार का? याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.