Sharad Pawar's convoy overturned on Mumbai-Pune Expressway | Photo Credits: Twitter/ ANI

राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या ताफ्यातील एका गाडीला आज (29 जून) मुंबई पुणे एक्सप्रेसवर (Mumbai-Pune Expressway) अपघात झाला आहे. दरम्यान शरद पवार सुरक्षित असून ते त्यांची गाडी सुखरूप प्रवासाला पुढे गेली असल्याची माहिती पुणे ग्रामीण पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. अपघातग्रस्त गाडी पलटल्याने या गाडीच्या चालकाला किरकोळ दुखापत झाली आहे.

पुण्याकडून मुंबईच्या दिशेने जाताना अमृतांजन पुलाजवळ हा अपघात झाला आहे. सकाळी 10 च्या सुमारास पोलिसांची गाडी स्लिप होऊन उलटली. दरम्यान नजिकच्या पोलिस सटेशनला माहिती समजताच तात्काल ते तेथे दाखल झाले आणि पुढील काही वेळातच गाडी हटवून वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे. Mumbai–Pune Expressway: मुंबई-पुणे हायवेवर तीन वाहनांचा भीषण अपघात, 2 जण जागीच ठार; खालापूर टोल नाका नजीकची घटना.

ANI Tweet

शरद पवार यांनाही या अपघाताची माहिती मिळताच त्यांनी संबंधित कर्मचार्‍यांची चौकशी केली आहे.दरम्यान वाहन चालकासोबतच एक पोलिस कर्मचारीदेखील अपघातग्रस्त झाला आहे. मात्र हा किरकोळ अपघात असल्याने शरद पवारांनी त्यांचा पुढील दौरा कायम ठेवला आहे. सध्या शरद पवार निसर्ग चक्रीवादळाच्या पाहणीच्या दौर्‍यातही स्वतः जागोजागी फिरून आढावा घेताना दिसले. आता मुंबई, पुण्यासह महाराष्ट्राच्या कोरोना संकटावर ते स्वतः जातीने लक्ष देऊन आढावा घेत आहेत.