Sharad Pawar | Twitter

रत्नागिरीच्या (Ratnagiri)  राजापूर (Rajapur)  तालुक्यातील बारसू (Barsu) गावात ग्रामस्थ रिफायनरी विरोधात रस्त्यावर बसले आहेत. दरम्यान या विरोधकांवर दडपशाही होत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. त्यानंतर राज्यात सरकार- विरोधकांमध्ये जुंपली असताना रत्नागिरी जिल्ह्याचे पालकामंत्री आणि राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांच्याशी शरद पवार (Sharad Pawar) यांनी बातचीत केल्याचं समोर आलं आहे.

शरद पवारांनी या बातचितीचा तपशील उलगडताना बारसू येथे आंदोलकांवर बळाचा वापर केला होता की नाही याबद्दल विचारणा केल्याचं म्हटलं आहे. दरम्यान सामंत यांनी मला सांगितले की 'सरकारने आंदोलकांवर बळाचा वापर केला नाही. त्यांनी मला असेही सांगितले की सरकार तिथे फक्त माती परीक्षण करत आहे आणि जमिनीचे सर्वेक्षण अद्याप सुरू झालेले नाही.' दरम्यान शरद पवार यांनी सरकारला या प्रकरणी घाई न करण्याचा आणि स्थानिकांशी रिफायनरी बाबत चर्चा करण्याचा सल्ला दिला आहे.

पहा ट्वीट

दरम्यान आंदोलक महिलांना अटक केल्यानंतर त्यांना आता सोडून दिले आहे. असे सामंत म्हणाले आहेत. तसेच प्रशासन आणि शासनाने शेतकऱ्यांशी बोललं पाहिजे. शासन बोलायला तयार आहे. जिल्हा प्रशासनाने तिथल्या 300 ते 350 लोकांसोबत बैठक आयोजित केली आहे. त्यांच्याशी चर्चा करून त्यांना विश्वासात घेऊन पुढील हालचाली केल्या जाणार असल्याचं सरकार म्हणत आहे. Devendra Fadnavis On Barsu Refinery Protest: रत्नागिरीतील बारसु रिफायनरी प्रकल्पाला राजकारणासाठी विरोध करणार्‍यांचा विरोध सहन केला जाणार नाही - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.

मंगळवारी ड्रिलिंगचे काम सुरू केल्यानंटर पोलिसांनी 110 आंदोलकांना ताब्यातही घेतले आहे. यावरून ठाकरे गट देखील आक्रमक होत त्यांनी सरकारवर दडपशाहीचे आरोप केले आहेत.