राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Photo Credits-Twitter)

शरद पवार (Sharad Pawar) हे महाराष्ट्रातील मातब्बर राजकारण्यांपैकी एक आहे. मात्र मागील चोवीस तासामध्ये त्यांच्या विकीपीडिया प्रोफाईलमध्ये सलग तीन वेळेस बदल करण्यात आल्याने सध्या ते चर्चेमध्ये आहे. विकीपिडिया (Wikipedia) पेजवर शरद पवारांच्या नावापुढे 'भ्रष्टाचारी नेता'(Corrupt) असा उल्लेख करण्यात आला होता. त्यानंतर 'लॉयल' (Loyal) आणि आता शरद पवारांच्या नावापुढे 'लोकप्रिय' (Most Popular) नेता असे विशेषण वापरण्यात आलं आहे. विकीपिडीयाच्या पेजवर ही माहिती काही अज्ञातांकडून बदलण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.

Sharad Pawar (Photo Credits: Wikipedia)

शरद पवार हे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा आहेत. यंदा खुद्द शरद पवार आगामी लोकसभा निवडणूकीमध्ये रिंगणात उतरणार नसले तरीही त्यांची कन्या सुप्रिया सुळे (बारामती) आणि नातू पार्थ पवार (मावळ) मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढणार आहेत.