अडीच वर्ष राज्यात महाविकास आघाडी सरकार (Maha Vikas Aghadi Government) चालवत असताना राष्ट्रवादी (NCP), कॉंग्रेस (Congress) आणि शिवसेना (Shiv Sena) या तिन्ही पक्षाने ऐक्याचा नारा दिला होता. पण सरकार पडताचं या नाऱ्याचा सुर बदलला की काय अशी शंका वर्तवण्यात येत आहे. कॉंग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी कन्याकुमारी (Kanyakumari) ते कश्मिर (Kashmir) अशी भव्य भारत जोडो यात्रा काढली आहे. कॉंग्रेससह विविध दक्षिणात्य छोट्या मोठ्या पक्षांनी या यात्रेस हजेरी लावत राहुल गांधी तसेच कॉंग्रेसला आपला पाठींबा दर्शवला आहे. पण महाराष्ट्रात (Maharashtra) मात्र चित्र वेगळ आहे. राज्यात गेले अडीच वर्ष महाविकास आघाडी सरकारचं म्हणजे तीन पक्षांचं राज्य होत. यांत शिवसेना (Shiv Sena), राष्ट्रवादी (NCP) आणि कॉंग्रेसचा (Congress) समावेश होता. पण सरकार बरखास्त होता राष्ट्रवादीने या तिघाडीतून काढता पाय घेतला आहे.
काल गांधी जयंती निमित्त मुंबई कॉग्रेसकडून (Mumbai Congress) वतीने "नफरत छोडो, भारत जोडो" (Nafraat Chhodo Bharat Jodo) यात्रा काढण्यात आली होती. या यात्रेला काल मुंबईतील (Mumbai) ऑगस्ट क्रांती मैदान येथून सुरुवात झाली असून मंत्रालयासमोरील महात्मा गांधींच्या पुतळ्याजवळ या यात्रेची सांगता करण्यात आली. मुंबई काँग्रेसच्या या यात्रेत सीपीआय (CPI), शिवसेनेचे ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत (MP Arvind Sawant) तसेच महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांचाही सहभाग होता. पण या यात्रेत मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकाही बड्या नेत्याचा सहभाग दिसला नाही. या यात्रेत सामील होण्याच्या नावाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचे केवळ 100-150 कार्यकर्तेच दिसून आले. (हे ही वाचा:-)
तरी राष्ट्रवादीच्या या सावध भुमिकेची राज्याच्या राजकारणात मोठी चर्चा आहे. तसेच ऐक्याचा नारा देणारी महाविकास आघाडी विखुरली आहे का असा सवाल भाजपाकडून विचारण्यात येत आहे. तरी राष्ट्रवादीचं या यात्रेत सहभागी न होणं यामागे राष्ट्रवादीचे सर्वोसर्वे शरद पवार (Sharad Pawar) यांची नक्कीचं काही रणणिती असू शकते अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे