मुंबई मध्ये Narcotics Control Bureau कडून सोमवारी नार्कोटिक्स ड्रग्स हे केक आणि ब्राऊनीज मधून देणार्या एका जाळ्याचा पर्दाफाश करण्यात आला आहे. या केक आणि ब्राऊनीजला रेव्ह पार्ट्यांमध्ये पुरवले जात असे. या प्रकरणामध्ये एनसीबी कडून एका व्यक्तीला अटक केली आहे. NCB चे संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede)यांनी एका टीप च्या आधारे दक्षिण मुंबई मध्ये माझगाव परिसरात असलेल्या बेकरी कम घरावर छापा टाकला. तेथे कसून तपास आणि झाडा झडती केल्यानंतर 10 किलो hashish brownie cakes बनवल्याचं आढळलं. हे पॅक करून डिलेव्हरी साठी सज्ज ठेवण्यात आले होते. मुंबई: डोंगरी, वाडी बंदर आणि नागपाडा भागात NCB चा छापा, ड्रग्जसह 3 जणांना केली अटक.
बेकरी कम ड्रग्स लॅब चालवणारी व्यक्ती ही पेशाने सायकोलॉजिस्ट म्हणजेच मानसोपचार तज्ञ होती. दक्षिण मुंबई मध्येच एका प्रतिष्ठित हॉस्पिटल मध्ये ती व्यक्ती काम करत असल्याचेही सांगण्यात आले आहे. Rahmeen Charaniya असे त्याचे नाव असून तो 25 वर्षीय आहे. त्याच्या कॉलेजवयीन काळापासूनच तो या ड्रग्सच्या धंद्यामध्ये असल्याची बाब समोर आली आहे.
वानखेडेंनी दिलेल्या माहितीनुसार, 'आरोपी विविध प्रकारचे केक द्यायचा या मधील रेनबो केक मध्ये hashish, ganja आणि चरस यांचा केक च्या मिश्रणात समावेश असे. Hashish Brownies आणि Pot Brownies मध्ये weed मिसळलेली असे. त्याच्या राहत्या घरी 350 ग्राम Opium आणि 1.7 लाख रोकड सापडली आहे'. आरोपीने अशाप्रकारे narcotic drugs ने युक्त केक बनवण्याची आयडीया आपल्याला एका drug trafficking वर भाष्य करणार्या ओटीटी बेस्ड इंटरनॅशनल सीरीज मधून मिळाल्याचं सांगितलं आहे.
Charaniya सोशल मीडीया प्लॅटफॉर्म द्वारा ऑर्डर घेत होता तर स्वतः डिलेव्हरी देत होता. दक्षिण मुंबई आणि पश्चिम उपनगरात त्याचे क्लाएंट्स असल्याचे देखील त्याने सांगितले आहे. त्याला ड्रग्सचा सप्लाय करणारा देखील क्रॉफर्ड मार्केट मध्येच होता. Ramzan Shaikh या 40 वर्षीय व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडे 50 ग्राम Hashish सापडले आहे.
एनसीबी कडून अशाप्र्कारे केक आणि ब्राऊनी मधून ड्रग्सचं कनेक्शन शोधण्याचा दुसरा प्रयत्न आहे. मागील महिन्यात देखील पश्चिम मुंबई मध्ये देखील अशीच छापेमारी झाली आहे.