Naxal Attack | Photo Credits: Twitter/ ANI

भामरागड तालुक्यातील चकमकीची घटना ताजी असताना आज नक्षलवाद्यांनी गडचिरोली बंदची घोषणा केली आहे. पोलिस चकमकीमध्ये नक्षली नेता सृजनाक्का (Srujanakka)  ठार झाल्याच्या निषेधार्थ आज बंदची घोषणा करण्यात आली आहे. दरम्यान रात्री उशिरा गडचिरोली (Gadchiroli) मध्ये  धानोरा परिसरात  राष्ट्रीय महामार्गावर छत्तिसगड मधून रेती वाहतूक करणार्‍या 3 ट्रक ला पेटवण्यात आलं आहे. काही दिवसांपूर्वी अतिदुर्गम भागात नक्षलवाद्यांनी पत्रकं टाकून आजच्या गडचिरोली बंदची माहिती दिली होती.

दरम्यान 17 मे दिवशी भमरागड मध्ये लदंडी-गुंडूरवाही जवळ असणार्‍या जंगलात सकाळच्या सुमारास नक्षलवाद्यांनी भुसुरुंग स्फोट घडवून आणला होता. यामध्ये पोलीस उपनिरीक्षक धनाजी होनमने आणि शिपाई किशोर आत्राम हे शहीद झाले होते. दरम्यान चकमकीमध्ये काही नक्षलवादीदेखील ठार झाल्याची माहिती समोर आली आहे.

ANI Tweet

मीडीया रिपोर्ट्स नुसार, काल राष्ट्रीय महामार्गावरून जाणार्‍या खाजगी कंत्राटदाराचे ट्रक थांबवून त्यामधील लोकांना हुसकावून लावले. त्यानंतर वाहनांना आग लावण्यात आली. यामध्ये टायर फुटल्यानंतर मोठा आवाज झाला. धुराचे लोट पहायला मिळाले. यामुळे काही काळ स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण होतं.