वक्फ बोर्ड (Waqf Board) जमिनीवरुन काल (10 नोव्हंबर) दुपारपासून अफवा पसरवण्याचे काम सुरु आहे. नवाब मलिक (Nawab Malik ) यांच्या अडचणी वाढणार, अशाही बातम्या येत आहेत. यात तथ्य नाही. अंमलबजावणी संचालनालय (ED) ने याबाबत प्रेसनोट काढून खरे काय ते स्पष्ट करावे, अशी मागणी राज्याचे अलपसंख्याक मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली आहे. ते मुंबई येथील पत्रकार परिषदेत (Nawab Malik Press Conference बोलत होते. या वेळी त्यांनी कंगना रनौत (Kangana Ranaut), एसटी संप (MSRTC Strike), ड्रग्ज प्रकरण याशिवया राज्यातील विरोध पक्ष असलेल्या भाजपची भूमिका यांसारख्या विविध मुद्द्यांवर भाष्य केले.
केंद्र सरकारने कंगना रनौत या अभिनत्रीला राष्ट्रीय पुरस्कार दिला आहे. या अभिनेत्रीने भारतीय स्वातंत्र्य लढ्याबद्दल अनुचित उद्गार काढले आहेत. या उद्गारांची गंभीर दखल घेत केंद्र सरकारने कंगनाला दिलेले सर्व राष्ट्रीय पुरस्कार परत घ्यावेत. ही अभिनेत्री 'मलाना क्रिम' घेऊन बोलत असते, तिच्यावर गुन्हा दाखल करुन तातडीने अटक करवी, अशी मागणीही नवाब मलिक यांनी केली. राज्यात सुरु असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत बोलताना नवाब मलिक यांनी मोठे विधान केले. एसटी कर्मचारी हे राज्य सरकारचे कर्मचारी होऊ शकत नाही. एसटी विलिनीकरण करण्याची प्रक्रिया किचकट आणि विलंब लावणारी आहे. तसेच, हे कर्मचारी जर राज्य सरकारच्या सेवेत आले तर राज्य सरकारवर अतिरिक्त ताण पडणार आहे. कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी राज्य सरकारला अतिरिक्त कर्ज काढावे लागेल, असे मलिक म्हणाले. (हेही वाचा, Sanjay Raut on Kangana Ranaut: 'काही लाज लज्जा…माफी तरी मागावी', संजय राऊत यांची कंगना रनौत हिच्यावर टीका, भाजपच्या अध्यक्षांना 'मन की बात' करण्याचा सल्ला)
'ट्विट'
Mumbai | We strongly condemn actress Kangana Ranaut's statement (India got freedom in 2014). She insulted freedom fighters. Centre must take back the Padma Shri from Kangana & arrest her: Maharashtra Minister Nawab Malik pic.twitter.com/xTy2VPFohk
— ANI (@ANI) November 12, 2021
दरम्यान, विलिनीकरण वगळता एसटी कर्मचाऱ्यांच्या अनेक मागण्या राज्य सरकारने मान्य केल्या आहेत. एसटी कर्मचाऱ्यांनी हट्टाला पेटू नये. आपला संप मागे घ्यावा. खास करुन राजकीय नेत्यांच्या (भाजप) गळाला लागू नये असेही मलिक म्हणाले. दरम्यान, आज एसटी कर्मचाऱ्यांचे विलीनिकरण करा अशी मागणी भाजपही करत आहे. भाजपने केंद्र सरकारकडे पाहावे. एअर इंडिया आणि केंद्रातील अनेक सरकारी संस्था, उद्योग खासगी लोकांना दिले जात आहेत. त्यामुळे त्याबाबत भाजपने भाष्य करावे. एसटी कर्मचाऱ्यांना न्याय द्यायचे आम्ही पाहू, असेही मलिक म्हणाले.
नवाब मलिक यांनी यांनी या वेळी एक सूचक विधान केले. त्यांनी म्हटले की, भविष्यात आपण भाजपा नेत्यांचे घोटाळे बाहेर काढणार, असा इशाराही मलिक यांनी दिला.