मुंबईमध्ये आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 च्या पार्श्वभूमीवर
पक्षांमध्ये आयाराम गयारामांची सुरूवात झाली आहे. दरम्यान राष्ट्रवादीचे माजी अध्यक्ष सचिन अहिर यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे. त्यानंतर रिक्त झालेल्या पदावर आता नवाब मलिक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नवाब मलिक (Nawab Malik) हे राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील ज्येष्ठ नेत्यांपैकी एक आहे. सचिन अहीर यांचा शिवसेना प्रवेश; उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत बांधल शिवबंधन; राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला धक्का
नवाब मलिक हे महाराष्ट्राचे माजी गृहनिर्माण मंत्री होते. यापूर्वी 1996, 1999, 2004 मध्ये त्यांनी कुर्ला येथील नेहरूनगर विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवली होती. त्यानंतर 2009 साली मुंबईमधील अणुशक्ती नगर भागातून निवडणूक लढवली होती. नवाब मलिक हे मूळचे उत्तर प्रदेशचे आहेत. 1970 साली ते मुंबईमध्ये आले.
.@NCPspeaks चे राष्ट्रीय अध्यक्ष @PawarSpeaks यांच्या मान्यतेने मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अध्यक्षपदी श्री. @nawabmalikncp यांची नियुक्ती करण्यात येत आहे.
- @Jayant_R_Patil @AjitPawarSpeaks @supriya_sule pic.twitter.com/tNxyvP9fP8
— NCP (@NCPspeaks) August 5, 2019
प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज ट्विटरच्या माध्यमातून राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या मान्यतेने मुंबई अध्यक्षपदी नवाब मलिक यांची नियुक्ती केली असल्याचं पत्र ट्विट केले आहे.