Navneet Rana: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान 'मातोश्री'बाहेर शिवसैनिकांचा पहारा; नवनीत राणा यांना पोलिसांकडून 149 अन्वये नोटीस
Navneet Rana | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांचे खासगी निवासस्थान 'मातोश्री' (Matoshri) बाहेर जाऊन हनुमान चालिसा (Hanuman Chalisa) पठण करणार अशी घोषणा खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि त्यांच्या पती आमदार रवि राणा यांनी केली. त्यानंतर शिवसैनिकांनी मोठ्या प्रमाणावर 'मातोश्री'बाहेर उपस्थिती दर्शवली आहे. शिवसैनिक मोठ्या प्रमाणावर मातोश्रीवर जमले आहेत. जणू काही मातोश्रीवर शिवसैनिकांचाच पहारा आहे. दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्र्यांचे सरकारी निवासस्थान 'वर्षा' बंगल्याबाहेरही शिवसैनिक जमले आहेत. दरम्यान, मुंबई पोलिसांच्या खार विभागाकडून राणा दाम्पत्याला 149 अन्वये नोटीस दिली आहे.

नवनीत राणा आणि रवी राणा हे दाम्पत्य मुंबईमध्ये पोहोचल्याचे वृत्त आहे. राणा दाम्पत्य मुंबईमधील नंदगिरी गेस्ट हाऊस येथे उतरल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे राणा दाम्पत्याचे बुकींग असलेल्या नंदगिरी गेस्ट हाऊसलाही शिवसैनिकांनी वेढा घातला आहे. त्यामुळे आता पुढे काय घडते याकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. वर्षा बंगला, मातोश्री आणि नंदगिरी गेस्ट हाऊस येथे मोठ्या प्रमाणावर शिवसैनिक जमले आहेत. (हेही वाचा, Navneet Rana Challenge to CM: नवनीत राणा यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना खुले आव्हान; मातोश्रीबाहेर वाचणार हनुमान चालीसा)

राणा दाम्पत्य हे ट्रेनने मुंबईत येणार अशी चर्चा होती. त्यामुळे पहाटेपासूनच शिवसैनिक हे सीएसएपटी स्थानकावर ठाण मांडूण बसले होते. मात्र, राणा दाम्पत्य हे ट्रेनने आले नाही. हे दाम्पत्य विमानाने मुंबईत दाखलझाल्याचे समजते.