राज्यात कोरोनाच्या विरोधात लढा देण्यासह काही गोष्टी सुरु सरकारने सुरु करण्यास परवानगी दिली आहे. त्याचसोबत राज्याअंतर्गत प्रवासासाठी सराकरने ई-पास अत्यावश्यक असल्याची सुचना सुद्धा नागरिकांना दिली आहे. मात्र गेल्या काही दिवसात ई-पास मिळवण्यासाठी आणि तयार करण्यासाठी नागरिकांची फसवणूक केली जात असल्याचे प्रकार समोर आले आहेत. याच दरम्यान आता पोलिसांकडून ई-पाससाठी खोटे आधार कार्डचा वापर करणाऱ्या नवी मुंबईतील (Navi Mumbai) दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे.(Ganeshotsav E-Pass: गणेशोत्सवासाठी खासगी वाहनांना लागणारे ई-पास आता सहज उपलब्ध होणार; असा करा अर्ज)
नवनाथ दाभाडे आणि ईश्वर सिंग असे आरोपींचे नाव आहे. या दोघांनी ई-पास मिळवण्यासाठी बनावट आधार कार्डची कॉपी पोलिसांच्या संकेतस्थळावर अपलोड केली. मात्र ज्यावेळी वेरिफिकेशन करण्यात आले तेव्हा आधार कार्डवरील पुढील क्रमांक हा पाठी असलेल्या क्रमांकापेक्षा वेगळा होता. या प्रकरणी अधिक तपास केला असता या दोघांनी बनावट आधार कार्ड हे प्रवास करण्यासाठी लागणाऱ्या ई-पाससाठी वापरल्याचे समोर आले.(Lockdown 4 मध्ये आंतरराज्यीय प्रवास करण्यासाठी E-Pass मिळणार; serviceonline.gov.in/epass/ वर पहा कसा कराल अर्ज?)