नवी मुंबई येथील कोपरी गावात राहणारा एक चिमुरडा उद्यानात खेळण्यास गेली होती. त्यावेळी चिमुकल्याला साप चावल्याची घटना घडली. परंतु चिमुरड्याला उपचारासाठी रुग्णालयात घेऊन गेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. यामुळे चिमुरड्याच्या परिवारावर दुखाचा डोंगर कोसळला आहे. तसेच परिसरातील पालकवर्गांना या घटनेमुळे धक्का बसला असून भीतीचे वातावरण पसरले आहे. ज्या उद्यानात चिमुकला खेळण्यास गेला होता ते महापालिकेचे असल्याचे बोलले जात आहे.
सुमीत असे चिमुरड्याचे नाव असून तो कोपर मधील महापालिकेच्या उद्यानात खेळण्यासाठी गेला होता. या उद्यानाजवळ एक तलाव सुद्धा आहे. सुमित हा त्याच्या आजोबांसोबत उद्यानात खेळण्यासाठी आला होता. तर संध्याकाळच्या वेळेस खेळताना सुमितला अचानक साप चावला. यामुळे सुमितला तातडीने रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले. परंतु उपचारापूर्वीच सुमित याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. तर कोपरी परिसरात सापांचा वावर अधिक वाढल्याचे नागरिकांकडून सांगण्यात येत आहे.(ठाणे येथे नाल्यात पडून 7 वर्षीय मुलाचा मृत्यू, स्थानिकांकडून संताप व्यक्त)