Navi Mumbai Shocker: नवी मुंबईत 10 वर्षाच्या मुलाचा लैंगिक छळ, आरोपी अल्पवयीन; पोलिस ठाण्यात तक्रार दाखल
Molestation | (Photo Credits: Archived, edited)

Navi Mumbai Shocker: गेल्या काही दिवसांपासून नवी मुंबईत गुन्हेगारी वाढताना दिसत आहे. मागील आठवड्यात अल्पवयीन मुलं बेपत्ता झाल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. त्याचबरोबर बीड शहरात मध्ये देखील एका 8 वर्षाच्या मुलीचा एका अल्पवयीन मुलाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली ही घटना ताजी असताना दरम्यान एका आईने आपल्या अल्पवयीन मुलाचा लैंगिक छळ झाल्याचा आरोप केला आहे. धक्कादायक म्हणजे लैंगिक छळ करणारे आरोपी हे देखील अल्पवयीन असल्याचे उघडकीस आले आहे. (हेही वाचा- कुर्ल्यात मैत्रिणीच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, तिघांवर गुन्हा दाखल

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 10 वर्षाच्या मुलावर दोन अल्पवयीन मुलांनी लैंगिक अत्याचार करून मारहाण देखील केली त्यानंतर त्याला जीवे मारण्याची धमकी देखील देण्यात आली होती. ही घटना २०२३ मधील ऑगस्ट ते सप्टेंबर महिन्यात घडली. पीडित मुलाला धमकी दिल्यानंतर त्याने ही घटना कोणाला ही सांगितली नाही. पोलिसांनी सांगितल्या प्रमाणे अल्पवयीन आरोपी आणि पीडित मुलगा हे दोघेही शेजारी राहतात. पीडित आणि आरोपी हे नवी मुंबईतील उलवे परिसरात राहतात. एक अल्पवयीन आरोपी १५ वर्षाचा आहे  तर दुसरा १६ वर्षाचा आहे.

घाबरून ही घटना कोणाला ही सांगितली नाही परंतु काही दिवसांपूर्वी एक नातेवाईक त्यांच्या घरी आला त्याच्यासोबत त्यांचा ११ वर्षाचा मुलगा देखील आला आहे. पीडित आणि या मुलाची मैत्री असल्याने पीडित मुलाने ही सर्व हकिकत त्या मुलाला सांगितली. मुलाने मागचा पुढचा कोणताही विचार न करता पीडिताच्या आईला जाऊन घटना सांगितली. घटना ऐकून आईच्या पायाखालील जमिन सरकली. त्यानंतर आईने नवी मुंबईतील पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार केली. पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला. पोलिस घटनेअंतर्गत पुढील तपास करत आहे. परंतु या प्रकरणात अद्याप कोणालाही ताब्यात घेतले नाही.