Mumbai News: मुंबईतील कुर्ला परिसरात एका अल्पवयीन मुलीवर 2 महिलांसह एका 42 वर्षाच्या व्यक्तीने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचे धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पीडित मुलीची आई नर्स आहे. आईच्या मैत्रिणींने मुलीवर लैंगिक छळ केल्याचे समोर आले आहे. कुर्ल्यातील विनोबा भावे नगर पोलिसांनी तीन जणांविरुध्द गुन्हा दाखल करुन घेतला आहे. ही घटना 2021 मध्ये घडली. पीडित मुलीची आई नर्स असल्यामुळे रात्रीच्या वेळी कामाला जावे लागायचे त्यावेळी आईच्या दोन मैत्रिणी या पीडित मुलीकडे झोपायला यायच्या.
मिळलेल्या माहितीनुसार, 2018 रोजी मुलीचे वडिल मरण पावले तेव्हा पासून घरात माय लेकी राहत आहे. आई नर्स असल्यामुळे रात्रीच्या वेळीस कामाला जावे लागायचे त्यावेळी आईच्या मैत्रिणी घरी झोपायला यायच्या. काही वेळा जेवणासाठी ऑनलाईन फुड ऑर्डर करायचे आणि त्यासोबत दारू मागवायचे. तीला ते दारू पिण्यास भाग पाडयचे त्यानंतर बेधुंद होऊन झोपायची. त्यानंतर दोघी जणी तिच्या शरिराच्या प्राव्हेट पार्टला हात लावयाचे. त्यानंतर असं बराच वेळ सुरु होते. एके दिवशी एका महिलेचा बॉयफ्रेड देखील घरी येतो, या दोघींजणी त्याच्याकडे झोपण्यासाठी दबाब टाकला. पीडितीने नकार दिल्यावर तीचे आक्षेपार्ह फोटो व्हायरल करतील याची धमकी दिली. या घटनेनंतर पीडीत मुलगी डीप्रेशन मध्ये गेली. (हेही वाचा- लग्नाला नकार दिला म्हणून तरुणीला केली मारहाण; दिली गंभीर परिणाम भोगावे लागण्याची धमकी)
या सर्व घटनांमुळे पीडितेला त्रास होऊ लागला, दोन वर्ष मुलीवर रुग्णालयात मानसिकतेचे उपचार सुरु होते. अखेर पीडितीने या सर्व घटनेची माहिती कुर्ल्यातील पोलिसांना देण्यास आली. त्यानंतर पोलिसांनी सर्व आरोपींवर गुन्हा दाखल केले. पोलिस या प्रकरणातील सर्व आरोपींच्या शोधात आहे. या घटनेनंतर कुर्ला परिसरात मोठी खळबळ उडाली