Navi Mumbai Shocker: नवी मुंबईत एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. 12 वर्षी मुलीशी लग्न करून तिच्यावर वारंववार बलात्कार करून तिला गर्भवती केल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी नवी मुंबईतील पोलिसांनी 29 वर्षीय तरुणाविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. नवी मुंबईतील पनवेल या ठिकाणी हा प्रकार घडला आहे. (हेही वाचा- अक्षय्य तृतीया दिवशी पुणे जिल्ह्यात बालविवाह होऊ नये म्हणून जिल्हाधिकाऱ्यांचा कडक आदेश)
देशात बालविवाह हा बेकायदेशीर असताना देखील आरोपी तरुणाने अल्पवयीन मुलीशी लग्न केले. दोघांचे सहा महिन्यांपूर्वीच लग्न झाल्याची माहिती समोर आली आहे. आरोपी तरुण आणि पीडित मुलगी हे दोघेही मुळचे साताऱ्या जिल्ह्यातील आहे. तरुणाने सहा महिन्यांपूर्वी पीडित तरुणीशी लग्न करून तिच्यावर वारंवार बलात्कार केल्याचे अधिकाऱ्यांने माहिती दिली. बलात्कार करून मुलगी गर्भवती राहिल्याची माहिती समोर आली. गुरुवारी पनवेल येथे स्थानिक डॉक्टरांनी पाहणी केल्यावर मुलगी चार महिन्यांची गरोदर असल्याचे समजले. या माहितीच्या आधारे डॉक्टरांनी पोलिसांना सूचना दिल्या.
पोलिसांनी घटनास्थळी पोहचून चौकशी केली. त्यावेळी सर्व हकिकत समोर आली. या घटनेअंतर्गत पोलिसांनी आरोपी तरुणावर गुन्हा दाखल केला. भारतीय दंड संहिता (आयपीसी), लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण (पॉक्सो) कायदा आणि बालविवाह प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी खांदेश्वर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.