नवी मुंबईतील सर्वात मोठे होलसेल मार्केट म्हणून ओखळ असणारे एपीएमसी मार्केट (APMC) कोरोना व्हायरसमुळे बंद ठेवण्यात आले होते. मात्र आता पुन्ही एपीएमसी मार्केट सुरु करण्यात आले आहे. या ठिकाणी सोशल डिस्टंन्सिंगसह कोरोना संबंधित सर्वोतोपरी काळजी घेण्यात येत आहे. याच दरम्यान आता एपीएमसी मार्केटमध्ये कांद्याची होलसेल किंमत 3 रुपये प्रति किलो झाली आहे. कांद्याची कमी मागणी आणि भरपूर प्रमाणात उन्हाळी पीक ही यामागील कारणे आहेत.
आकाराने लहान असणारे कांदे 3-4 रुपये प्रति किलो दराने, मध्यम आकाराचे कांदे 5-7 रुपये प्रति किलो दर आणि आकाराने मोठे असलेले कांदे 8-10 रुपये प्रति किलो दराने एपीएमसीच्या बाजारात विकले जात आहेत. मात्र किरकोळ विक्रेते या कांद्यांसाठी 20-30 रुपये प्रति किलो असा दर लावत आहेत. कांद्याचा बहुतांश साठा अजून तसाच असून त्याचा खप झालेला नाही. कारण नागरिकांकडून कांद्याची खरेदी करण्यात आलेली नाही. व्यापाऱ्यांनी असे म्हटले आहे की, मान्सूनमध्ये कांद्याचा ऐवढा साठा असाच ठेवल्याने ते कुसून जाण्याची शक्यता आहे.(Mumbai Rain Update: आजपासून पुढील 48 तास मुंबई सह राज्यात विजांसह मुसळधार पावसाची शक्यता, हवामान खात्याचा इशारा)
दरम्यान, राज्यात कोरोना व्हायरसने थैमान घातल्यानंतर एपीएमसी मार्केट मधील काही कामगारांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. त्यामुळे एपीएमसी मार्केट बंद करण्याचा निर्णय स्थानिक प्रशासनाने घेतला होता. त्यानंतर आता एपीएमसी मार्केट पुन्हा सुरु झाले असून तेथे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून विशेष नियमावली सुद्धा जाहीर करण्यात आली आहे.