प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: Twitter)

मुंबईत (Mumbai) सध्या मेट्रोने (Metro) प्रवास करणाऱ्या नागरिकांची हजारोपटीने अधिक आहे. तसेच मेट्रो सुरु झाल्यापासून नागरिकांना प्रवासादरम्यान होणारा अधिक त्रास कमी झाला आहे. परंतु हार्बर लाइनवर (Harbour Line) अद्याप लोकलचीच सोय असून या मार्गावर ही बहुसंख्य लोक त्याचाच उपयोग करतात. मात्र आता येत्या नोव्हेंबर महिन्यापासून नवी मुंबई (Navi Mumbai) मध्ये मेट्रो धावण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

बेलापूर ते पेंधर दरम्यान ही सेवा पहिल्या टप्प्यात सुरु करण्यात येणार आहे. यासाठी त्याची चाचणी पुढील आठवड्यात पार पडणार असल्याचे सांगण्यात आले आहे. तर बेलापूर ते पेंधर हा मेट्रोचा मार्ग 11 किमीचा असून त्याचे काम पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. सीबीडी बेलापूर येथील उड्डाणपुलाचे काम सुद्धा लवकरात लवकर पूर्ण होणार आहे. तसेच मेट्रोचे इंजिन हे कारशेड नजीक असणाऱ्या ट्रॅकवर उतरवण्यात येणार आहे. त्याचसोबत तळोजा येथे स्वतंत्र विद्युत सबस्टेशन उभारण्यात आले आहे. याबाबत सामना ऑनलाईन यांनी अधिक वृत्त दिले आहे.(Mumbai Local Train Update: मध्य, हार्बर रेल्वे मार्गावर रविवारी मेगा ब्लॉक, पाहा वेळापत्रक)

मेट्रोच्या पुढील आठवड्यातील चाचणीसाठी सिडको कडून तयारी करण्यात आली आहे. तसेच काही दिवसांपूर्वी मेट्रोची चाचणी पार पडली असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला अससल्याचे बोलले जात होते. मात्र संपूर्ण तयारी झाल्यानंतरच मेट्रो चाचणी होणार असल्याची अधिकृत माहिती सिडको यांनी दिली आहे.