(संग्रहित प्रतिमा)

नवी मुंबई (Navi Mumbai) येथील माया बारमालकाची हत्या (Murder) झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. उडपीमध्ये बेलनहल्लीजवळच्या कुक्के गावातील जंगलामध्ये 10 फेब्रुवारी रोजी त्यांचा मृतदेह आढळला होता. याप्रकरणी पोलिसांनी 4 आरोपींना अटक केली असून त्यांच्या विरोधात हत्येचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. 4 आरोपींपैकी 1 जण मृत बारमालकाच्या येथे कामाला होता. तसेच गेल्या तीन महिन्यांपूर्वी आरोपी आणि बारमालकांमध्ये भांडण झाले होते. यावादातूनच बार मालकाची हत्या करण्यात आली, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. तसेच याप्रकरणी पोलीस अधिक चौकशी करत आहे.

वशिष्ठ यादव असे मृत बारमालकाचे नाव असून ते नवी मुंबई येथे बार चालवत होते. सुमित मिश्रा (23), अब्दुल शुकूर (35), अविनाश कारकेरा (25), मोहम्मद शरीफ (32) असे आरोपींची नावे आहेत. सुमित हा माया बारमध्ये कामाला होता आणि इतर तिघे आरोपी एका ट्रॅव्हल कंपनीत कार्यरत आहेत. मात्र, गेल्या तीन महिन्यांपूर्वी सुमित आणि बारमालक यादव यांच्यात पैशावरून भांडण झाले होते. त्यावेळी सुमीतने बारमधील नोकरी सोडली होती. त्यानंतर सुमीतने 10 फेब्रुवारी रोजी यादव यांना उडपी येथे घेऊन आला आणि त्यांचा वायरीने गळा आवळून हत्या केली. स्थानिकांनी मृतदेह पाहिल्यानंतर स्थानिक पोलिसांना कळवले होते. त्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक केली. हे देखील वाचा- धक्कादायक! मानवी तस्करीमध्ये देशात महाराष्ट्र अव्वल; राज्यात मुंबई, पुणे व ठाणे जिल्ह्यात सर्वात लोक गायब

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांनी मृतदेह पाहिल्यानंतर पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी सदरचा मृतदेह ताब्यात घेऊन त्याचे शवविच्छेदन केले असता, त्याचा मृत्यू वायरीने गळा आवळून झाल्याचे समजले. त्यानुसार कर्नाटक पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटविण्याचा प्रयत्न केला असता, सदर व्यक्ती हा नवी मुंबईतील सीबीडी परिसरातील माया बारचा चालक मालक असल्याची माहिती मिळाली होती. तसेच आरोपींनी आणलेली कारच्या शोधातून पोलिसांनी त्यांना अटक केली.