Navi Mumbai Crime: नोकरीसाठी तगादा, संतापलेल्या तरुणाकडून आईची गळा आवळून हत्या
Murder | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

Navi Mumbai Police: कामधंदा न करता घरामध्ये रिकामटेकडा बसून राहिल्याबद्दल हटकल्याने चिडलेल्या तरुणाने चक्क जन्मदात्या आईचीच हत्या केली आहे. ही घटना नवी मुंबई (Navi Mumbai Crime) येथील वाशी परिसरात असलेल्या कोपरी गावात घडली. रूपचाँद रेहमान शेख असे आरोपचे नाव आहे. तो केवळ 21 वर्षांचा आहे. धक्कादायक म्हणजे कोणताही कामधंदा न करता तो घरात बसून राहायचा. त्यामुळे त्याची आई त्याला सातत्याने काहीतरी नोकरी पाहा किंवा कामधंदा कर म्हणून पाठी लकडा लावत असे. घटना घडली त्या दिवशीही तिने असाच लकडा लावला असता संतापलेल्या रुपचाँद याने चक्क घरातील गमजाने आईचा गळा आवळला आणि तिची हत्या केली. घटनेची माहिती मिळताच एपीएमसी पोलिसांनी आरोपीला अटक केले. पोलिसांनी आरपीला घटनास्थळावरुनच अटक केल्याचे समजते.

सलमा उर्फ जहानारा खातून रहेमान शेख असे मृत महिलेचे नाव आहे. तिच्यात आणि तिचा मुलगा रुपचाँद याच्यात नोकरी अथवा कामधंदा करण्यावरुन वाद झाला. त्यातून आरोपीने टोकाचे पाऊल गाठले. आरोपी हा नवी मुंबई येथील कोपरी परिसरातील गावदेवी मंदिराजवळ सागर भोईर नामक इमारतीमध्ये आईसोबत राहात असे. त्यांचे हातावरचे पोट होते. त्यामुळे आई सलमा ही घरकाम करत असे. त्यातून मिळणाऱ्या चार पैशांमधून कुटुंबाचा गाडा हाकला जायचा. मात्र, घरकाम करुन मिळणाऱ्या पैशांमध्ये उदरनिर्वाह करतान कमालीची ओढातान व्हायची. त्यामुळे मुलाने काहीतरी नोकरी, कामधंदा करवा अशी सलमाची इच्छा होती. त्यातूनच ती कधी मायेने, कधी रागावून आरोपीला कामधंदा अथवा नोकरी करण्यास सांगत असे. मात्र, तो काहीही कामधंदा न करता घरातच बसून राहायचा.

सलमा आणि रुपचाँद यांच्यात रविवारी (29 ऑक्टोबर) रात्री असाच वाद झाला. हा वाद टोकाला गेला. त्यातूनच मध्यरात्री 1.20 च्या सुमारास रुपचॉंद याने घरातील गमचा घेला आणि आईच्या गळ्यात टाकून तो आवळला. ज्यामुळे आई सलमा हिचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्यातील भांडणाची माहिती इमारती जवळच राहणाऱ्या जास्मीन हिला कळली. जास्मीन ही सलमा हिची मुलगी तर आरोपीची बहिण आहे. घडलेला प्रकार पाहून तिने तातडीने पोलिसांना महिती दिली. प्राप्त माहितीवरुन पोलीस घटनास्थळी दाख झाले. त्यांनी जान्मिनने दिलेल्या तक्रारीवरुन आरोपी रुपचॉंद याच्याविरुद्ध गुन्हा दाल केला. तसेच, त्यालाअटक केली. घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. दरम्यन, आरोपीला ताब्यात घेतले असून तपास सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.