नवी मुंबई (Navi Mumbai) परिसरात दमदार पावसाने हजेरी लावली आहे. या पावसाने मुंबईतील झाडे उन्मळून पडली आहेत काही ठिकाणी मोठे होर्डिंग्ज आणि कमानी कोसळण्याच्या घटना घडल्या. या घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. दरम्यान ठाणे-बेलापूर रस्त्याला जोडला जाणाऱ्या नवी मुंबईतील ऐरोली सेक्टर-3 (Airoli Sector-3) येथे जवळपास 40 फूट उंचीची कमान कोसळली (Navi Mumbai Arch Collapsed) आहे. त्यामुळे या मार्गावर काही प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली आहे. अवजड वाहनांना प्रवेशबंदी करण्यासाठी ही कामना उभारण्यात आली होती. दरम्यान, दुर्घटना घडली असली तरी त्यामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाही.
मान्सून मुंबई आणि परिसरात दाखल झाला आहे. त्यामुळे मुंबई, नवी मुंबई शहरामध्ये दमदार पावसाने हजेरी लावली आहे. सोसाट्याचा वारा, विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस हजेरी लावताना पाहायला मिळतो आहे. ऐरोली परिसरातही अशाच प्रकारचा दमदार पाऊस पडला. ऐरोली सेक्टर-3 मध्ये असलेली कमान या पावसामुळे कोसळली. एरोली येथील भारत बिजली येथील रेल्वेरुळांतर्गत अवजड वाहनांना प्रवेशबंदी करण्यासाठी ही कमान उभारण्यात आली होती. ही कामा 40 फूट उंचीची होती. दरम्यना, कमान कोसळल्याची माहिती मिळताच नवी मुंबई महापालिकेचे ऐरोली विभाग अधिकारी, वाहतूक पोलीस आणि रबाळे पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. (हेही वाचा, Navi Mumbai: पाम बीच रोडवर अज्ञात वाहनाच्या धडकेत फ्लेमिंगो पक्षांचा मृत्यू; पक्षीप्रेमींकडून चिंता व्यक्त (Watch Video))
प्राप्त माहितीनुसार, कोसळलेली कमान रेल्वे प्रशासन हद्दीत आहे. त्यामुळे सदर घटेची माहिती आणि तपशील मिळविण्यासाठी रेल्वे प्रशासनास माहिती घेण्यासाठी कळविण्यात आले आहे. दरम्यान, कमान रस्त्यावरच कोसळल्याने ती हायड्रा मशीनच्या साहाय्याने काढण्यात येणार असल्याचे समजते. दरम्यान, रस्त्यावरील दोन्ही बाजूची वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. कमानीचा सांगाडा आणि मलबा दूर करेपर्यंत ही वाहतूक काहीकाळ बंद ठेवली जाणार असल्याचे समजते.
दरम्यान, मुंबई येथील विक्रोळी येथेही मुसळधार पावसात इमारीचे पत्र्याचे छत कोसळल्याने वडील आणि मुलाचा मृत्यू झाला आहे. ही दुर्दैवी घटना घडलेली इमारत एसआरएची होती आणि ती बांधकामाधीन होती. घटना घडल्यानंतर मुंबई महापालिकेने घटनेची दखल घेऊन सदर इमारतीच्या विकासकाला काम थांबविण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, इमारतीचे छत नेमक्या कोणत्या कारमुळे कोसळले याचा तपासही अधिकाऱ्यांनी सुरु केला आहे.