नवी मुंबई: वाशी APMC मार्केटमध्ये कोरोना बाधित रुग्ण आढळ्याने मार्केट अनिश्चित काळासाठी बंद ठेवण्याचा निर्णय
APMC | Photo Credits: commons.wikimedia.org

लॉकडाऊनच्या काळातही लोकांना अन्नधान्याचा, भाजीपाल्याची टंचाई निर्माण होऊ नये म्हणून नवी मुंबईतील APMC मार्केट सुरु ठेवण्यात आले होते. मात्र या मार्केटमधील एका व्यापाराला कोरोनाची लागण झाल्याने हे मार्केट 11 एप्रिलपासून अनिश्चित काळासाठी बंद ठेवण्याचा निर्णय APMC सचिव अनिल चव्हाण यांनी घेतला आहे. यामुळे ग्राहकांची चांगलीच चंगळ होणार हे वेगळं सांगायची गरज नाही. मुंबईत 79 नवे COVID-19 बाधित रुग्ण आढळले असून रुग्णांची एकूण संख्या 775 झाली आहे. तर नव्या 9 रुग्णांचा मृत्यू झाला असून मुंबईतील मृतांची एकूण संख्या 54 वर गेली आहे अशी माहिती मुंबई महापालिकेने दिली आहे.

कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी देशभरात 21 दिवसांचा लॉकडाऊन ठेवण्यात आला आहे. अशा स्थितीत नागरिकांची गैरसोय होऊ नये मुंबईत सर्व भाज्या, फळभाज्या विक्रेत्यांसाठी महत्वाचे समजले जाणारे वाशी APMC मार्केट सुरु ठेवण्यात आले होते. मात्र या मार्केटमध्ये आता कोरोना बाधित रुग्ण आढळल्याने हे मार्केट आता बंद ठेवण्यात आले आहे. Coronavirus: आज मुंबईमध्ये कोरोना विषाणूच्या 79 प्रकरणांची नोंद; शहरातील संक्रमितांची एकूण संख्या 775 वर

जीवनावश्यक गोष्टींचा पुरवठा सुरु राहावा यासाठी एपीएमसी मार्केट 20 मार्च पासून सुरु करण्यात आले होते. पण येथे ग्राहक आणि व्यापाऱ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत होती. तसेच बाजारात कुणीही सोशल डिस्टन्सिंग पाळत नव्हते. त्यामुळे कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

मुंबईत (Mumbai) आज कोरोना विषाणू (Coronavirus) संक्रमणाची 79 पॉझिटिव्ह प्रकरणे नोंदवली गेली असून, शहरातील एकूण कोरोना व्हायरस रुग्णांची संख्या 775 झाली आहेः बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) याबाबत माहिती दिली. बीएमसीने पुढे सांगितल्याप्रमाणे, मुंबईच्या धारावी येथे आज कोरोना विषाणूचे 3 नवीन रुग्ण आढळले आहेत. अशाप्रकारे येथील एकूण सकारात्मक रुग्णांची संख्या 17 वर पोहचली आहे. यामध्ये 3 जणांच्या मृत्यूचाही समावेश आहे. मुंबई मध्ये आज एकूण 9 रुग्णांचा मृत्यू झाला. या नऊही जणांना दीर्घकालीन आजार होते.