Arrest | Pixabay.com

Navi Mumbai News: तुर्भे परिसरातून एमआयडीसी पोलिसांनी एका 32 वर्षीय तरुणाला अटक (Arrest) केली आहे. त्याच्याकडून 5.1 लाख रुपयांच्या किमतीचे 1.318 किलो चरस जप्त करण्यात आला आहे. दारू विकण्याच्या प्रयत्न करताना त्या व्यक्तीला पकडण्यात आले आहे. पोलिसांनी सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले आहे. तुर्भेत काही दिवसांपासून अमली पदार्थाचा व्यवहार करत असल्याची माहिती मिळाली. संजीव प्रकाश पाटील असं अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. तो नेरुळ परिसरातील रहिवासी आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांना गोपयिन माहिती मिळाली त्यानंतर त्यांनी परिसरात सापळा रचला. दारू विक्रीचा प्रयत्न करताना पोलिसांनी त्याला पकडले. तुर्भे पोलिसा ठाण्यातील वरिष्ठ निरिक्षक रवींद्र दौंडकर यांनी निरीक्षक संजय जोशी आणि सहायक निरीक्षक नीलेश येवले यांच्यासह एक पथक तयार केले. पथकाने गुरुवारी सापळा रचून एका संशयित व्यक्तीला ताब्यात घेतले. पोलिसांनी चौकशी केली असता त्याच्याजवळील ड्रग्ज सापडले.

या प्रकरणात पोलीसांनी सदर व्यक्तीवर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून,पुढील तपासणी सुरु केली आहे. पोलिसांनी त्याच्या घराची झडती देखील घेण्यास सुरुवात केली आहे.