नाशिकच्या कांदा उत्पादक शेतकऱ्याकडून PMO कार्यालयाला मनीऑर्डर (Archived, edited, symbolic images)

देशात शेतकरी आणि शेतीची आवस्था दयनीय झाली आहे. त्यामुळे देशभरातील विविध ठिकाणचा नाराज शेतकरी दररोज मोर्चे, आंदोलने करत सरकारबद्दलची नाराजी, आक्रोश व्यक्त करतो आहे. महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकरी (Onion Productive Farmers) संजय साठे (Sanjay sathe) यांनी मात्र आपली नाराजी वेगळ्या पद्धतीने व्यक्त केली आहे. त्यामुळे या नाराजीची दखल थेट पंतप्रधान कार्यालयानेही (PMO)घेतली आहे. साठे यांनी 750 KG कांदा उत्पादित केला. मात्र, बाजारात त्याला केवळ 1064 रुपये इतके मूल्य मिळाले. त्यामुळे नाराज साठे यांनी हे पैसे थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनाच मनी ऑर्डर (Money Order) करुन पाठवले.

नाशिक (Nashik) जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील संजय साठे हे निवडक आधुनिक शेतकऱ्यांपैकी एक आहेत. ते सातत्याने आपल्या शेतीत आधुनिकतेचा प्रयोग करतात. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा (Barack Obama)यांनी 2010मध्ये केलेल्या भारत दौऱ्यात साठे यांना ओबामा यांच्याशी संवाद करण्याची संधी मिळाली होती. पंतप्रधानांना पाठवलेल्या मनीऑर्डरबाबत प्रसारमाध्यमांशी बोलताना साठे म्हणाले की, मी कोणत्याही राजकीय पक्षाचे प्रतिनिधित्व करत नाही. पण, सरकारच्या कारभाराबाबत मी नक्कीच नाराज आहे. माझ्या वेदनेतूनच मी पंतप्रधानांना मनी ऑर्डर पाठवली. भारतात कांद्याचे जितके उत्पादन होते त्यातील 50 टक्के कांद्याचे उत्पादन हे उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातून होते, असेही ते म्हणाले.

संजय साठे यांची मनी ऑर्डर भेटताच पंतप्रधान कार्यालयही हालले. त्यांनी थेट नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधला आणि शेतकरी आणि कांदा उत्पादकांच्या अडचणीबाबात माहिती घेतली. पंतप्रधान कार्यालयाने जिल्हाधिकारी कार्यालयाकडून माहिती घेतली की नाशिकमध्ये कादा उत्पादकांची समस्या नेमकी काय आहे. की या शतकऱ्याने नाराज होऊन आपली पूर्ण कमाई पंतप्रधान कार्यालायाला पाठवली. (हेही वाचा, कोल्हापूरच्या शेतकऱ्याचा आंबेडकर भवनात तिसऱ्या मजल्यावरुन पडून मृत्यू)

नाशिकचे जिल्हाधिकारी शशिकांत मंगरुळे यांनी शेतकऱ्यासोबत फोनवरुन माहिती घेतली. तसेच, लवकरच ते या शेतकऱ्याची भेट घेऊन चर्चाही करणार आहेत. शेतकऱ्यांशी संपर्क साधून ते कांदा उत्पादकांना येणाऱ्या अडचणी जाणून घेतील. संजय साठे यांनी सुमारे 750 KG कांदा उत्पादित केला. पण, ते जेव्हा हाच कांदा बाजारात विकायला गेले तेव्हा त्याला केवळ प्रति किलो 1 रुपया दर मिळाला. पण, फारच घासाघीस केल्यावर त्यांना काद्याला प्रतिकिलो 1.40 रुपये इतका दर मिळाला. ज्याचे 1064 रुपये इतके पैसे आले. त्यामुळे नाराज झालेल्या संजय साठे यांनी 29 नोव्हेंबरला पंतप्रधान कार्यालयाला मनी ऑर्डर करुन आपली नाराजी व्यक्त केली.