Farmer (Image used for representational purpose only) (Photo Credit: Pixabay)

Kisan Mukti March in Delhi :  शेतकऱ्यांच्या मागण्या सरकारपर्यंत पोहचवण्यासाठी देशभरातील शेतकरी सध्या दिल्लीमध्ये पोहचले आहेत. दरम्यान कोल्हापूरच्या एका शेतकऱ्याचा आंबेडकर भवनामध्ये तिसऱ्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला आहे. हा अपघात नक्की कसा झाला ? या बाबतची तपासणी सुरु आहे. Kiran Santapa  (वय 52) असे मृत पावलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. देशभरातील शेतकरी संघटनांच्या वतीने दिल्लीत मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. खासदार राजू शेट्टी देखील या मोर्चामध्ये सहभागी झाले होते.

महाराष्ट्रासह तामिळनाडू, गुजरात, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश या भागातून सुमारे 35,000 शेतकऱयांनी दोन दिवसीय किसान मोर्च्यामध्ये सहभाग घेतला होता. किसान मोर्च्यामध्ये विपरीत घटना घडू म्हणून 3500 दिल्ली पोलीस तैनात करण्यात आले आहेत.

सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांविरुद्ध एल्गार करण्यासाठी शेतकरी दिल्लीला पोहचले आहे. देशभरातून सुमारे 200 हुन अधिक शेतकरी संघटना दिल्लीला पोहचल्या आहेत.कर्जमाफी आणि शेतमालाला दिडपट हमीभाव मिळावा अशी या शेतकर्यांची मागणी आहे.