Nashik Weather Update: नाशिक शहरासह जिल्ह्याचा पारा घसरला, पहा आजचे तापमान
Cold | Representational image (Photo Credits: pixabay)

नाशिक शहरासह (Nashik) जिल्ह्यात काही दिवसापासून कमालीचा गारठा वाढला आहे. सोमवारी नाशिकला 11.1 अंश सेल्सिअस तापमानाची (Temperature) नोंद करण्यात आली आहे. तसेच, रविवारी कमाल 30.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद नाशिकमध्ये करण्यात आली आहे. नाशिकचे निफाड (Niphad) हे देखील गारठले आहे. सोमवारी 15 रोजी कुंदेवाडी येथील गहु संशोधन केंद्रात पारा 6.5 अंशावर घसरल्याची नोंद झाली आहे. पारा घसरल्याने अनेकांनी शेकोट्या पेटवल्याचे दिसून येत आहे. निफाडला यंदाच्या निचांकी तापमानाची नोंद झाली आहे.    ( Cold Wave in Maharashtra: राज्यात पारा घसरला, विदर्भात थंडीची लाट)

नाशिकचा पारा घसरल्याने द्राक्षमण्यांची फुगवण थांबणार आहे. याचा प्रतवारीवर परिणाम होतो तर परिपक्व द्राक्षमणी हे तडकण्याचा धोका आहे. चालु द्राक्ष हंगाम हा अखेरच्या टप्यात संकटात सापडला आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

उत्तर महाराष्ट्रातील अनेक भागातील तापमानात घट झाल्याचे चित्र आहे.  जळगावात किमान तापमान 9.9 अंशांवर पोहोचले आहे, तर अहमदनगरमध्ये 11.5 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली आहे. पुण्यातदेखील तापमान 12.2 अंशांपर्यंत खाली उतरलं, महाबळेश्वरात किमान तापमान 14.5 अंश सेल्सिअस तर बारामतीत तापमान 12.1 अंशांवर आहे.