नाशिक मध्ये आज भाजपाला (BJP) अजून एक धक्का बसला आहे. माजी आमदार वसंत गीते (Vasant Gite) आणि सुनिल बागुल (Sunil Bagul) यांनी आज शिवसेनेत पक्ष (Shiv Sena) प्रवेश केला आहे. हे दोघेही पूर्वाश्रमीचे शिवसैनिक होते. मात्र नंतर त्यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला होता. मात्र आता त्यांची घरवापसी झाली आहे. आज शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश झाला आहे. आगामी नाशिक महापालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर अशाप्रकारचे भाजपाला बड्या नेत्यांनी सोडचिठ्ठी देणं हा मोठा धक्का मानला जात आहे.
संजय राऊत यांनी नाशिकचा आगामी महापौर हा शिवसेनेचा असेल अशी आशा व्यक्त केली आहे. वसंत गीते आणि सुनील बागुल यांना शिवसेना नाही. तसेच शिवसेनेलाही ते नवे नसल्याचं सांगत त्यांचं पक्षात मोठ्या आनंदाने स्वागत करत असल्याचं संजय राऊत म्हणाले. आज संध्याकाळी वसंत गीते आणि सुनील बागुल दोघेही पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. येत्या काही दिवसांत अजून काही नेत्यांचे पक्षात प्रवेश होऊ शकतात असे संकेत देखील त्यांनी दिले आहेत.
वसंत गीते हे नाशिक मधील महत्त्वाचे नेते आहेत. भाजपापूर्वी त्यांनी मनसे मध्ये देखील काम केले होते. मात्र आता त्यांनी पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला आहे. तर सुनील बागुल हे भाजप प्रदेशउपाध्यक्ष होते. Balasaheb Sanap Join BJP: बाळासाहेब सानप यांचा शिवसेनेला 'जय महाराष्ट्र', दोन वर्षांमध्ये बदलले तीन पक्ष.
संजय राऊत सध्या दोन दिवसांच्या नाशिक दौर्यावर आहेत. मागील महिन्यात माजी आमदार बाळासाहेब सानप यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला होता. आता आगामी निवडणूका पाहता फोडाफोडीच्या राजकारणाला सुरूवात झाल्याचं म्हटलं जात आहे.