नाशिकच्या (Nashik) पंचवटी (Panchavati) भागामध्ये एका व्यक्तीचा सोसायटी मध्ये पार्किंगच्या वादामधून खून झाल्याचा प्रकार समोर आला आहे. मृत व्यक्ती 49 वर्षीय बुद्धन लक्ष्मण विश्वकर्मा आहे. हिरावाडी येथील श्री केशव हरी अपार्टमेंट मध्ये ते राहत होते. रविवारी सोसायटीचे अध्यक्ष वसंत घोडे आणि इमारतीत भाडेकरू म्हणून राहणाऱ्या आणखी एका व्यक्तीसोबत पार्किंगवरून त्यांची जोरदार चर्चा झाली, त्यानंतर सर्व रहिवाशांची बैठक घेण्यात आली, असे एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.
सोमवारी वसंत घोडे आणि त्यांची दोन मुले बुद्धन विश्वकर्मा यांच्या घराजवळ या विषयावर चर्चा करत असताना बुद्ध यांची पत्नी मोना यांनी त्यांना तेथून जाण्यास सांगितले. घोडे आणि त्याच्या मुलांनी कथितरित्या मोनावर हल्ला केला. जेव्हा तो तिला वाचवण्यासाठी बुद्धन आला होता, तेव्हा त्यालाही मारहाण केली असे पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.
सोमवारी रात्री उशिरा मोनाला रुग्णालयात दाखल करण्यात आले. बुद्धन आणि त्यांचा मुलगा हॉस्पिटलमधून बाहेर येत असताना त्यांनाही त्रास जाणवला आणि ते खाली कोसळले. त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. शवविच्छेदन अहवालात अंतर्गत दुखापतींमुळे त्यांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाल्यानंतर मंगळवारी घोडे व त्यांच्या दोन मुलांविरुद्ध पंचवटी पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू असून अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.