डॉक्टर प्रियंका पवार, नाशिक (Nashik Pregnant Doctor News) येथील एका रुग्णासाठी देवदूत ठरलेले व्यक्तीमत्व. डॉक्टर म्हटले की रुग्णसेवा करणे हे त्यांचे कर्तव्यच मानले जाते. परंतू, डॉ. प्रियंका पवार (Doctor Priyanka Pawar) यांची कहाणी काहीशी निराळी आहे. म्हणून ती सर्वसामान्य घटनांपेक्षा काहीशी वेगळी ठरते. डॉक्टर प्रियंका पवार या सध्या गर्भवती आहेत. म्हणजेच त्या पुढच्या काहीच काळात आई होणार आहेत. अशा काळात महिलांच्या हालचालींवर मर्यादा येतात हे सर्वजण जाणतात. परंतू, कधी कधी परिस्थितीच अशी उद्भवते की, तुम्हला तुमच्यापेक्षा समोरच्याचा जीव वाचवणे महत्त्वाचे ठरते आणि मग तुम्ही इतर कोणताही विचार न करता ती कृती करता. जो तुमचा पेशा असतो. प्रियंका पवार यांच्याबाबततीच असेच काहीसे घडले.
घडले असे की, विशप्राशन केलेला एक रुग्ण नाशिक जिल्ह्यात निफाड तालुक्यातील म्हाळसाकोरे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल झाला. आरोग्य केंद्रातील डॉक्टरांनी त्यांना तपासले. पण झाले असे की, रुग्णाची हालत अधिकच गंभीर झाली होती. त्याचे प्राण वचवायचे तर त्याला इतर रुग्णालयात दाखल करावे लागणार होते. परंतू, असे करताना एक मोठीच अडचण निर्माण झाली. रुग्णाला घेऊन जाण्यासाठी रुग्णवाहीका (Ambulance) उपलब्ध होती. पण, चालक नेमका रजेवर होता. त्यामुळे आता रुग्णवाहिका चालवणार कोण? हा मोठाच प्रश्न उद्भवला. अशा वेळी प्रियंका पवार यांनी इतर कोणताही विचार न करता रुग्णवाहिकेचे चालकत्व स्वीकारले आणि रुग्णालाय दुसऱ्या दवाखान्यात नेण्यात आले. (हेही वाचा, Nashik Viral Video: नाशिकमध्ये कॉलेजबाहेर मुलींचा हाय व्होल्टेज ड्रामा, हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल)
डॉ. प्रियंका पवार गर्भवती असल्याने त्यांच्या हालचालींवर मर्यादा होत्या. अशा स्थितीत रुग्णवाहिका चालवणे त्यांच्या आणि त्यांच्या बाळाच्या आरोग्यासाठी धोक्याचे होते. पण असे असतानाही त्यांनी धोका पत्करला रुग्णास निफाड येथील ग्रामिण रुग्णालयात दाखल केले. रुग्णावर उपचार झाले आणि त्याचे प्राणही वाचले. त्यामुळे डॉ. प्रियंका पवार या स्थानिक नागरिकांच्या कौतुकाचा विषय ठरल्या आहेत.