Nylon Manja | (Photo credit: archived, edited, representative image)

पतंग उडविण्याचा आनंद घेताना आपण दुसऱ्याच्या दुख:चे कारण ठरतो, याची अनेकांना यत्किंचित कल्पनाही नसते. नाशिक (Nashik) येथील एका तरुणाचा याच कारणामुळे मृत्यू झाला. सोनू किसन धोत्रे नावाचा अवघा 23 वर्षांचा तरुण आपल्या दुचाकीवरुन निघाला असता नायलॉन मांजा (Nylon Manja) त्याच्या मानेभोवती अडकला. ज्यामुळे त्याचा गळा चिरुन मृत्यू झाला. या धक्कादायक प्रकारामुळे परिसर सुन्न झाला आहे. तर दुसऱ्या बाजूला अशाच एका घटनेत छत्रपती संभाजीनगर येथे एका पीएसआयचा गळा चिरला. त्यांना रुग्णालयात दाखल केले असता त्यांची प्रकृती अतिशय गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. नायलॉन मांजा वापरण्यास विक्री करण्यास बंदी आहे. असे असले तरीसुद्धा ते सर्ऱ्हास विकले जात आहेत. त्यामुळे पोलीस (Nashik Police) प्रशासन पुन्हा एकता मांजा प्रतिबंधांसाठी सक्रीय झाले आहे.

पाथर्डी परिसरातील इंदिरानगर येथील घटना

नायलॉन मांजा गळ्याला अडकून तो चिरला गेल्याने मृत्यू झालेल्या तरुणाचा नुकताच विवाह ठरला होता. पुढच्या काहीच दिवसांमध्ये त्याचा विवाह होणार होता असे समजते. नाशिक जिल्ह्यातील पाथर्डी परिसरातील इंदिरानगर येथे ही घटना घडली. गळा चिरल्याने गंभीर जखमी झालेल्या सोनू यास तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषीत केले. त्याच्या मृत्यूमुळे धोत्रे कुटुंबावर मोठा घाला घातला गेला आहे. (हेही वाचा, Nashik: नाशिकमध्ये नायलॉन मांजा वापराविरोधात पोलिसांची कारवाई तीव्र; 24 गुन्हे दाखल, अल्पवयीन मुलांच्या वडिलांना अटक)

नाशिक पोलीस सतर्क

एका तरुणाचा हाकनाक मृत्यू झाल्यानंतर नाशिक पोलीस अत्यंत सतर्क झाले आहेत. पोलिसांनी नायलॉन मांजा विक्रेता आणि वापरकर्त्यांवर कारवाई करण्यासाठी विशेष पथक तयार केले आहे. नायलॉन मांजा विकला आणि वापरला जाऊ नये यासाठी नाशिक पोलिसांची 31 पथके नियुक्त करण्यात आली आहे. ज्यामध्ये शहरातील उंच इमारती, छोट्या गल्ल्या आणि मैदाने यांच्या माध्यमातून पतंग उडवणाऱ्यांची चौकशी केली जाणार आहे. जर कोणी मांजा वापरताना आढळल्यास त्यावर कारवाई केली जाणार आहे. (हेही वाचा, Ban On Nylon Manja: पुणे पोलिसांकडून मकर संक्रांतपूर्वी बंदी असलेला नायलॉन मांजा जप्त)

काय कारवाई केली जाणार?

नायलॉन मांजा वापरताना आढलल्यास सदर व्यक्तीवर थेट सदोष मनुष्य वधाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला जाणार आहे. हा गुन्हा दाखल करण्यासाठी भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांचा आधार घेतला जाणार आहे. आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार, नाशिक पोलिसानी शहरातील 50 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्यावर नायलॉन मांजा विक्री आणि अवैध वापर केल्याचा आरोप आहे. याच प्रकरणात इतरांवरही कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे समजते.

भारतीय संस्कृतीमध्ये सण, उत्सवांची काहीच कमी नसते. त्यामुळे या सणांसोबत अनेक प्रथा, परंपराही जोडल्या जातात. मकर संक्रांती आणि पतंग यांचेही नाते असेच. मकर संक्रातीचा सण आला की, महिला आपला ओवसा आणि वाण घेऊन पुजा-अर्चा करण्यात मग्न असतात. तर घरातील लाहन मुले, तरुण आणि पुरुष मंडळी पतंग उडविण्याचा आंद घेतता. अनेकदा आकाशात उंचच उंच पतंग उडवताना दुसऱ्याचा पतंक कापण्याची स्पर्धाही सुरु असते. त्यातूनच मग पतंगाला धाग्या ऐवजी मांजा वापरण्याची पद्धत सुरु झाल्याचे सांगितले जाते. पतंग कापल्यानंतर किंवा कोसळल्यानंतर अनेकदा हा मांजा रस्त्यावर पडतो, झाडांमध्ये अडकतो, अशा वेळी तो दुचाकीवरुन निघालेल्या दुचाकीस्वारांच्या गळ्यामध्ये तो अडकतो. ज्यामुळे दुचाकीस्वारांचे गळे चिरलले जातात.