नाशिक येथे कोरोना व्हायरसचे आणखी 23 रुग्ण आढळून आल्याने आकडा 890 वर पोहचला
Coronavirus (Photo Credits: Pixabay)

महाराष्ट्रातील नाशिक (Nashik)  येथे कोरोना व्हायरसचे (Coronavirus) आणखी 23 रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे नाशिक जिल्ह्यात एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 890 वर पोहचला आहे. स्थानिक प्रशासनाकडून जाहीर करण्यात आलेल्या एका विधानात असे म्हटले आहे की, यामध्ये मालेगाव येथील 11 आणि नाशिक मधील 8 प्रकरणे आहेत. अन्य चार रुग्ण हे जिल्ह्याबाहेरील असून त्यांच्यावर अद्याप उपचार सुरु आहेत. हा रिपोर्ट गुरुवारी संध्याकाळ पर्यंतचा आहे.

नाशिक मधील कोरोनाग्रस्तांचा आकडा 890 वर पोहचली आहे. तर मालेगाव येथून 684 कोरोनाची प्रकरणे समोर आली आहेत. नाशिक मधील 59 आणि अन्य जिल्ह्यातील भागातून 111 प्रकरणे उघडकीस आली आहेत. जिल्ह्याबाहेरील 36 कोरोनाग्रस्त रुग्ण असून त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहे. आतापर्यंत 654 रुग्ण कोरोना व्हायरसमुळे बरे झाले असून त्यामधील 504 जण हे मालेगाव येथील आहेत. जिल्ह्यात एकूण 46 जणांचा बळी गेला आहे. त्यापैकी 43 जण हे मालेगाव मधील असल्याचे सांगण्यात आले आहे.(Coronavirus in Maharashtra: महाराष्ट्रात तुम्ही राहत असलेल्या जिल्ह्यात किती आहेत कोरोना रुग्ण, जाणून घ्या आजचे ताजे अपडेट्स)

 दरम्यान, महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा 41 हजारांच्या पार गेला आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाच्या परिस्थिती संदर्भात चिंता व्यक्त केली जात आहे. मात्र कोरोनाचा आकडा जरी वाढत असला तरीही राज्य सरकार कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. तर काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात कोरोनाचा वेग संथ करण्यात यश आले असले तरीही त्याची साखळी अद्याप तुटलेली नाही. येत्या 31 मे पर्यंत राज्यात लॉकडाउनचे आदेश कायम राहणार असल्याचा निर्णय ही घेण्यात आला आहे.