एका जेष्ठ महिलेची हत्या करून तिचे दागिने लंपास केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना नाशिक जिल्ह्यातील (Nashik) जुन्नर तालुक्यात (Junnar) 4 डिसेंबर रोजी घडली आहे. या घटनेनंतर नाशिक जिल्ह्यात एकच खळबळ माजली आहे. याप्रकरणी आळेफाटा पोलिसांनी 24 तासांत आरोपीला अटक केली असून त्याच्याविरोधात खूनेचा आणि चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. तसेच त्याच्याकडून चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. चोरीच्या उद्देशाने ही हत्या झाल्याचे समजत आहे. याप्रकरणी आळेफाटा पोलीसांनी अधिक चौकशीला सुरुवात केली आहे.
जानकुबाई अर्जुन चोरे (वय, 65) असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. जानकुबाई या साकोरी चोरे मळा येथील रहिवाशी आहेत. तर, अर्जुन शुभनारायण प्रसाद असे आरोपीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीने सेंट्रीगच्या कामाकरिता जानकुबाई यांना दुचाकीवरून बसून बाम्हणमळा येथील आपल्या राहत्या खोलीत घेऊन गेला. त्यानंतर त्याने तीक्ष्ण हत्याराने त्यांच्या डोक्यावर हल्ला केला. तसेच त्यांच्या अंगावरील दागिने घेऊन आणि घराला कुलूप लावून तो पळून गेला. मात्र, सायंकाळी जानकुबाई घरी लवकर न परतल्याने त्यांच्या नातेवाईक आरोपीच्या घरी पोहचले. त्यावेळी घराला कुलूप असल्याने नातेवाईकांनी खिडकीतून आत डोकावून पाहिले असता जानकुबाई त्यांना मृतअवस्थेत दिसल्या. हे देखील वाचा- Thane Crime: संतापजनक! पत्नी घराबाहेर जाताच सहा वर्षीय चिमुकलीवर करायचा अत्याचार; तब्बल 6 महिन्यानंतर सावत्र बापाला अटक
याप्रकरणी अर्जुन प्रसाद याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केल्यानंतर त्याचा तपास सुरु केला. दरम्यान, पोलीस आणि गुन्हे अन्वेशनच्या पथकाने आरोपीककडील मोबाईल लोकेशनचा अंदाज घेत त्याला नाशिक रेल्वेस्थानकातून अटक केली आहे. तसेच आळीफाटा पोलिसांनी पुढील तपासाला सुरुवात केली आहे. यासंदर्भात लोकमतने वृत्त दिले आहे.