महाराष्ट्र नवनिर्माण सेना (Maharashtra Navnirman Sena) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आणि भाजप (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यात नाशिक येथे नुकतीच भेट झाली. या भेटीनंतर नाशिक महापालिका निवडणउकीत मनसे-भाजप युतीच्या चर्चांना राजकीय वर्तुळात उधान आले. परंतू, मनसे (MNS) सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी या चर्चांना पूर्णविराम दिला. नाशिक महापालिका निवडणूक (Nashik Municipal Corporation Election) मनसे स्वबळावर लढेन कोणत्याही पक्षासोबत युती करणार नाही, असे संदीप देशपांडे यांनी सांगितले. अमित ठाकरे आणि संदीप देशपांडे हे मनसेचे दोन्ही नेते आज नाशिक दौऱ्यावर होते. या वेळी त्यांनी प्रसारमाध्यमांना ही माहिती दिली.
मनसेला पदार्पणात नाशिकमध्ये मोठे यश मिळाले. नाशिकमध्ये प्रथमच मनसेची बहुमताने सत्ता आली. परंतू, त्यानंतर मात्र मनसेला नाशिकमध्ये घरघर लागली. पाठिमागील महापालिसा, विधानसभा आणि जवळपास इतर सर्वच निवडणुकीत मनसेने सपाटून मार खाल्ला. पराभवाच्या धक्क्यातून मनसे आता कुठे सावरते आहे. मनसेने निवडणुकांना सामोरे जाण्यासाठी पुन्हा एकदा कंबर कसली आहे.
संदीप देशपांडे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, आमच्याकडे कोणत्याही पक्षाने युतीसाठी प्रस्ताव दिला नाही. राज ठाकरे यांनी नाशिकचा मनापासून स्वीकार आणि संगपोण केले आहे. आता पुन्हा एकदा सर्व कार्यकर्त्यांमध्ये मनापासून संगम घडवून आणण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. या प्रयत्नांच्या जोरावर मनसे नाशिकमध्ये कमबॅक करेण, असा विश्वासही संदीप देशपांडे यांनी या वेळी व्यक्त केला. (हेही वाचा, MNS: आगामी महानगरपालिकांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना महत्वाच्या सूचना)
दरम्यान, नाशिकसोबतच मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुण्यातही सक्रीय झाली आहे. राज ठाकरे यांनी नाशिक आणि पाठपोठ पुणे शहराचा दौरा केला. दोन्ही दौऱ्यात त्यांनी मनसे पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या. या बैठकांमध्ये त्यांनी कार्यकर्त्यांची भावना जाणून घेतली. तसेच, जनमताचा कौल काय आहे हेही जाणून घेतले. मनसे कार्यकर्त्यांचा उत्साह वाढविण्यासाठी राज ठाकरे यांनी 'चांगले काम करा मी तुमच्या घरी जेवायला येतो' (शाखाप्रमुखांच्या घरी) अशी ऑफरही पुणे दैऱ्यात दिली. या ऑफरची मनसे कार्यकर्त्यांमध्ये जोरदार चर्जाही रंगली होती.