जत्रेत फिरायला गेली असताना एका 15 वर्षीय मुलीला तिचा जीव गमवावा लागला आहे. ही घटना नाशिक (Nashik) येथील मालेगाव (Malegaon) तालुक्यातील घोडेगाव (Ghodegaon) परिसरात सोमवारी घडली. पोलिस याप्रकरणी अधिक चौकशी करत आहे. या ठिकाणी पारंपारिक जत्रा भरते. तसेच दरवर्षीप्रमाणे यंदाही अनेक भाविकांनी घोडेगाव येथे मोठी गर्दी केली होती. या जत्रे दरम्यान अनेक खाद्य पदार्थांची, खेळणीची दुकाने उभी केली जाते. यापैकी एका दुकानात गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याने एका मुलीचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे आजुबाजूच्या परिसरात चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे.
सोनाली सुभाष गांगुर्डे असे त्या मृत मुलीची नाव असून ती शेजारी गावातील रहवासी आहे. या गावात दरवर्षीप्रमाणे गुलाबनबी बाबा यात्रा भरते. सोनाली ही याच यात्रेला आली होती. दरम्यान, सोनाली ही जत्रेच्या ठिकाणी लावलेल्या खेळणीच्या दुकानात थांबली होती. त्यानंतर काही क्षणातच संबधित खेळणीच्या दुकानात गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. यात सोनाली हिचा जागेवरच मृत्यू झाला. सोनलीसह अनेकजण जखमी झाल्याची माहितीसमोर आली आहे. जखमींना जवळच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेनंतर सोनालीच्या कुटुंबियांवर दुख:चे डोंगर कोसळले असून संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे. हे देखील वाचा- मुंबई: घरात आधुनिक पद्धतीने गांजाची लागवड करणा-या 26 वर्षीय तरुणाला अटक; आरोपीकडून 6 लाखांचा मुद्देमाल जप्त
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मालेगाव खडकवाडी भागात दरवर्षीप्रमाणे गुलाबनबी बाबा यात्रेला आज सुरुवात झाली आहे. दरम्यान या परिसरात खेळण्याची अनेक दुकाने उभी केली जातात. ज्या दुकानात स्फोट झाला त्याचा मालकही जखमी झाला आहे. तसेच हा स्फोट कशामुळे झाला, याचा स्थानिक पोलीस तपास करत आहे.