फोटो सौजन्य - Wikimedia Commons

मुंबई हाईकोर्टाचे नवे न्यायाधीश म्हणून नरेश पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच नरेश पाटील हे याच न्यायालयामध्ये प्रभारी मुख्य न्यायमूर्ती पदाचा भार स्वीकारत होते.

सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलिजियमने सांगितल्याप्रमाणे केंद्रीय विधी आणि न्याय मंत्रालयाने बुधवारी राष्ट्रपतींनी न्यायाधीश पाटील हे मुख्य न्याययाधीश पदाचा भार सांभणार असल्याचे घोषित केले आहे. तसेच प्रभारी मुख्य न्यायाधीशाचे पद सांभाळणाऱ्या न्यायाधीशांची इतर राज्यातील उच्च न्यायालयाच्या येथे बदली न करता त्याच न्यायलयात न्यायाधीश पदाचा भार स्वीकारण्याची संधी दिली जाते.

त्यामुळे कॉलिजियमने काही दिवसांपूर्वी न्यायाधीश पाटील यांचे नाव सुचविले होते. तर

एप्रिल 2019 मध्ये न्यायाधीश पाटील हे त्यांच्या पदावरुन निवृत्त होणार आहेत.