Loksabha Election 2024: नरेंद्र मोदी 2024 मध्ये तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचे भाकीत
Ramdas Athawale, Narendra Modi (Photo Credits Facebook)

Loksabha Election 2024: केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींविषयी (Naredra Modi) एक मोठी भविष्यवाणी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कट्टर आंबेडकरवादी आहेत. लोकसभा निवडणूक 2024 मध्ये ते तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील. विरोधी पक्ष एकत्र नाही. त्यांच्यात एकमत नाही. परंतु एनडीएमध्ये नरेंद्र मोदीं यांच्यासह आलेले अनेक पक्ष त्यांच्याबरोबर आहेत. यामुळे कोणी कितीही प्रयत्न केले तरी 2024 च्या निवडणुकीत नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात एनडीएचे सरकार बहुमताने विजय मिळवणार आहे. तसेच नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होणार असल्याचे रामदास आठवले यांनी म्हटले आहे.

दरम्यान, आठवले यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी निवडणूक व्यवस्थापक प्रशांत किशोर यांच्याशी झालेल्या बैठकीवर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. तसेच शरद पवार यांनी प्रशांत किशोर यांचा सल्ला न घेण्याचे आठवले यांनी म्हटले आहे. तसेच 2014 च्या निवडणुकीत प्रशांत किशोर हे नरेंद्र मोदी यांच्यासोबत होते. परंतु, 2019 च्या प्रशांत किशोर सोबत नसतानाही नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात एनडीएने 303 जागांवर विजय मिळवला होता. ज्या राज्यात प्रशांत किशोर यांनी प्रचार केला नाही, तिथेही भाजपचा झेंडा फडकला. हे देखील वाचा- Ajit Pawar Slams Nana Patole: अगामी निवडणुकीत स्वबळावर लढण्याचा नारा देणाऱ्या नाना पटोले यांना अजित पवार यांनी फटकारले

यापुढे आठवले म्हणाले की, देशातील राजकीय पक्षांनी प्रशांत किशोर यांचे मत घेऊ नये. नरेंद्र मोदी हे कट्टर आंबेडकरवादी आहेत. तसेच येत्या 2024 च्या निवडणुकीत पुन्हा एकदा मोदी लाट पाहायला मिळाणार असून नरेंद्र मोदीच पंतप्रधान होणार आहेत, असेही त्यांनी म्हटले आहे. रामदास आठवले हे मोदी सरकारमधील केंद्रीय राज्य मंत्री आहेत. ते नेहमी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर नेत्यांत तुलना करत असतात.