Ajit Pawar Slams Nana Patole: अगामी निवडणुकीत स्वबळावर लढण्याचा नारा देणाऱ्या नाना पटोले यांना अजित पवार यांनी फटकारले
Ajit Pawar | (Photo Credit: Facebook)

महाराष्ट्रात शिवसेना (Shiv Sena), काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादी (NCP) या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीचे सरकार (Maha Vikas Aghadi) स्थापन केले. मात्र, याचपार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी (Nana Patole) 2024 च्या निवडणुकीत स्वबळाचा नारा दिला आहे. एवढेच नव्हेतर, हायकमांडने मुख्यमंत्री पदाची जबाबदारी दिली तर, स्वीकारेन असेही त्यांनी म्हटले होते. यावर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. स्वबळावर निवडणूक लढवण्याचे विधान करणारे नाना पटोले यांच्या मताला त्यांनी महत्त्व नसल्याचे अजित पवार म्हणाले आहेत. अजित पवार यांच्या वक्तव्यावर काँग्रेसकडून कोणती प्रतिक्रिया येते? याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.

दरम्यान, अजित पवार यांनी कोल्हापूरात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला होता. यावेळी त्यानी नाना पटोले यांच्या वक्तव्यावर भाष्य केले आहे. "महाराष्ट्रातील निवडणुकींबाबतचा अंतिम अधिकार काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांना आहे. त्यामुळे कोणी काहीही वक्तव्य करत असेल तर त्याला काही महत्व नाही", असे अजित पवार यांनी म्हटले आहे. अजित पवार यांच्या विधानावर अद्याप काँग्रेसकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. हे देखील वाचा- महाराष्ट्रात Black Fungus च्या रुग्णांचा आकडा दिवसागणिक वाढतोय, केंद्राकडून AmphotericinB च्या अतिरिक्त बॉटल्सची राज्यांसह केंद्राशासित प्रदेशांना मदत

नाना पटोले यांच्या वक्तव्यावर महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नबाब मलिक म्हणाले की, काँग्रेस पक्ष पुढील निवडणूक स्वबळावर लढणार असल्याचे नाना पटोले यांनी सांगितले आहे. त्यांची मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे. महत्वाचे म्हणजे, कोणालाही एखाद्या पदाची अपेक्षा करण्यापासून रोखता येत नाही. सर्व पक्षांनी आपल्या कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी आणि पक्ष मजबूत करण्यासाठी काम करावे लागते, असेही त्यांनी म्हटले आहे.