पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर आज ते पहिल्यांदा मुंबईत आले आहेत. मुंबईतील विविध विकासकामांचे उद्घाटन व भूमिपूजन त्यांच्या हस्ते करण्यात आले. राजधानी मुंबईतील पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणाऱ्या महत्वाकांक्षी गोरेगाव-मुलुंड जोड रस्ता प्रकल्प (तिसरा टप्पा) अंतर्गत संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून जाणाऱ्या जुळा बोगद्याच्या कामाचे भूमिपूजन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले. गोरेगाव येथील नेस्को एक्झिबिशन सेंटर येथे हा सोहळा पार पडत असून तब्बल 30 हजार कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण आणि भूमिपूजन मोदींच्या हस्ते झालं. (हेही वाचा- PM Narendra Modi Mumbai Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी 13 जुलै रोजी मुंबई दौऱ्यावर; रस्ते, रेल्वे आणि बंदर क्षेत्राशी संबंधित प्रकल्पांचे करणार उद्घाटन, लोकार्पण आणि पायाभरणी)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठीतून सुरुवात केली. ते म्हणाले, “आज मला महाराष्ट्र आणि मुंबईसाठी तीस हजार कोटींच्या प्रकल्पासाठी भूमिपूजन आणि लोकार्पणाची संधी मिळाली. या प्रकल्पांमुळे मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरातील कनेक्टिव्हिटी अधिक चांगली होईल. यात रोड आणि रेल्वेव्यतिरिक्त महाराष्ट्रातील नवतरुणांना कौशल विकासासाठी खूप मोठी योजनाही समाविष्ट आहे. यातून महाराष्ट्रात मोठ्या संख्येने रोजगार निर्मिती होईल.”
पाहा पोस्ट -
#WATCH | Prime Minister Narendra Modi says, "Maharashtra has a glorious history, Maharashtra has a strong present and Maharashtra has dreams of a prosperous future. Maharashtra is a state which has a very big role in building a developed India. Maharashtra has the power of… pic.twitter.com/yhI4oX9TR4
— ANI (@ANI) July 13, 2024
महाराष्ट्राकडे गौरवशाली इतिहास आहे, शक्तीशाली वर्तमान आणि समृद्ध भविष्याचे स्वप्न आहे. मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे, त्यास जगाची आर्थिक कॅपिटल बनवण्याचे माझं स्वप्न असल्याचे मोदींंनी यावेळी म्हटले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांचे स्वागत केले. यावेळी, उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर मुख्यमंत्री शिंदेंनीही भाषण करत राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या समन्वयाने होत असलेल्या विकासकामांची माहिती दिली.