नारायण राणे यांची पुन्हा काँग्रेस पक्षात घरवापसी होणार?
नारायण राणे (फोटो सौजन्य-ट्वीटर)

महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे(Maharashtra Swabhimaan Paksh)अध्यक्ष आणि खासदार नारायण राणे (Narayan Rane) काँग्रेस पक्षात घरवापसी करणार असल्याचे संकेत माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी दिले आहेत. तसेच नारायण राणे सध्या भाजप (BJP) पक्षाच्या कोट्यातून राज्यसभेत खासदार म्हणून आपले कार्य बजावत आहेत. परंतु काँग्रेस (Congress) सोडून गेलेले सुद्धा पुन्हा घरवापसी करण्याच्या मार्गावर असल्याते थोरात यांनी अहमदनगरच्या नेवासाच्या ठिकाणी पत्रकारांना म्हणाले आहेत.

गेल्या वर्षात नारायण राणे यांनी काँग्रेसची साथ सोडून महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची स्थापना केली. मात्र राणे हे भाजपमध्ये रमत नसल्याचा दाव थोरात यांनी केला आहे. तसेच भाजप-शिवसेना सत्तेत आहेत. परंतु शिवसेना आणि राणे यांचे एकमेकांशी पटत नाही. (हेही वाचा- डान्स बार, सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे छोटा पेग्विंन खुश असणार -निलेश राणे)

येत्या आगामी निवडणुकीसाठी शिवसेना (Shivsena)-भाजप युती करण्याची शक्यता वर्तविली जात आहे. तर शिवसेना राणे असलेल्या पक्षासोबत युती करण्यासाठी तयार होणार का हा प्रश्न उभा राहिला आहे. मात्र भाजपने शिवसेनेसोबत युती केल्यास राणे यांना भाजपकडून त्याग करावा लागणार आहे. असे झाल्यास राणे यांना भाजपकडून मिळालेले खासदारकीच्या पदाचा राजीनामा द्यावा लागणार आहे. त्यामुळे राणे यांनी जर खासदारकीचा राजीनामा दिल्यास त्यांच्याकडे राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष हे दोन पर्याय आहेत.

नारायण राणे यांनी राजकरणात पहिले पाऊल शिवसेना पक्षातून ठेवले होते. त्यानंतर राणे यांनी सेनेकडून विविध पदांसाठी त्यांची नेमणूक करण्यात आली होती.परंतु काही काळानंतर त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. तिथेही आघाडी सरकारच्या वेळी विविध पदे देऊ करण्यात आली. मात्र पक्षातील नेत्यांसोबत त्यांचे पटले नाही म्हणून वेगळे होण्याचे ठरविले.