Representational Image (Photo Credits: File Photo)

बाप आणि मुलीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना मुंबईजवळील (Mumbai) नालासोपारा (Nallasopara) येथून समोर आली आहे. येथे, वडिलांच्या लैंगिक छळामुळे त्रस्त झालेल्या एका मुलीने त्यांच्यावर चाकूने हल्ला केला. सोमवारी दुपारी नालासोपारा पूर्व येथे मुलीने सावत्र वडील रमेश भारती याच्या गुप्तांगावर हल्ला केला. यानंतर 24 वर्षीय मुलीला अटक करण्यात आली आहे. या हल्ल्यात भारतीला गंभीर दुखापत झाली असून, त्याला कांदिवलीतील शताब्दी रुग्णालयात दाखल केले आहे. नालासोपारा पूर्वेकडील संतोष भुवन परिसरात ही घटना घडली.

तुळींज पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आईच्या पुनर्विवाहानंतर मुलीचा सावत्र पिता भारती गेल्या दोन वर्षांपासून तिच्यावर लैंगिक अत्याचार करत होता. सोमवारी, भारतीने मुलीवर लैंगिक संबंधांसाठी दबाव आणला. त्यावेळी मुलीने दीर्घकाळ अत्याचार सहन केल्यानंतर, बदला घेण्याची योजना आखली. तिने आपले डोळे बांधून लैंगिक संबंधास सहमती असल्याचे दर्शवले आणि त्यानंतर भारतीच्या गुप्तांगावर हल्ला केला.

हल्ल्यानंतर, रक्ताळलेला भारती घरातून पळून गेला, परंतु मुलीने त्याचा पाठलाग केला आणि रस्त्यावर त्यच्यावर आणखी हल्ला केला. साक्षीदारांनी दिलेल्या वृत्तानुसार, मुलीने उघडपणे सांगितले की, ती वर्षानुवर्षे लैंगिक शोषणामुळे त्रस्त आहे व याच त्रासाला कंटाळून तिने सावत्र वडिलांवर हला केला. भारती सध्या गंभीर स्थितीत आहे आणि त्यच्यावर मुंबईतील शताब्दी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तुळींज पोलिसांनी मुलीला ताब्यात घेतले आहे आणि घटनेचा सखोल तपास करत आहेत. पोलिसांनी सांगितले की, मुलीच्या जबाबाच्या आधारे, वडिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि मुलीविरुद्ध एफआयआर देखील नोंदवण्यात आला आहे.

दरम्यान, पुण्यातील वाघोली परिसरात पीठ गिरणीत काम करणाऱ्या 27 वर्षीय तरुणाने चौथी इयत्तेत शिकणाऱ्या मुलीला चॉकलेट देण्याचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप आहे. वृत्तानुसार, सोमवारी सकाळी 7 वाजताच्या सुमारास ही मुलगी शाळेत जाण्यासाठी घरून निघाली. वाटेत एक पिठाची गिरणी होती आणि तिथे काम करणाऱ्या तरुणाने तिला थांबवले, चॉकलेट देण्याचे आश्वासन दिले आणि गिरणीत घेऊन गेला. तिथेच त्याने तिच्यावर बलात्कार केला. या प्रकरणी मुलाला ताब्यात घेतले असून, त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. वाघोली पोलीस याचा तपास करत आहेत.