नालासोपारा: मित्राच्या भांडणात मध्यस्ती करण्यासाठी गेलेल्या एका तरुणावर तलवारीने हल्ला; एकास अटक
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: PTI)

मित्राचे भांडण सोडण्यासाठी मध्यस्ती करण्यासाठी गेलेल्या एका तरुणावर चौघा जणांनी तलवारीने हल्ला केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना नालासोपरा (Nalasopara) पूर्वेच्या प्रगती नगरमध्ये (Pragati Nagar) सोमवारी 29 जून रोजी घडली आहे. याप्रकरणी तुळींज पोलिसांनी एकाला अटक केली असून इतर तीन आरोपींचा शोध सुरु आहे. या घटनेत पीडित जबर जखमी झाला असून एका खाजगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु आहेत. हे सर्व आरोपी गुन्हेगारी प्रवृत्तीचे असून त्यांच्यावविरोधात यापूर्वी गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे आजूबाजुच्या परिसरात एकाच खळबळ उडाली आहे.

संजय मिश्रा (वय 22) असे पीडित तरुणाचे नाव आहे. संजयचा मित्र सलमान याचे 3 मित्रांशी भांडण सुरू होते. त्यावेळी संजयने भांडण सोडण्यासाठी मध्यस्ती केली. त्यामुळे सलीम, नूर आणि पप्पू या तीन आरोपींनी तलवारीने आणि बांबूने संजयवर हल्ला केला. त्यात तो जबर जखमी झाला होता. या घटनेत पीडित जबर जखमी झाला असून एका खाजगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु आहेत. संजयच्या फिर्यादीवरून तुळींज पोलिसांनी 4 आरोपींविरोधात हत्येचा प्रयत्न तसेच बेकायदेशीर शस्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हे दाखल केले आहेत. दरम्यान, या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हे देखील वाचा- मुंबई: अल्पवयीन 25 आठवडे गरोदर बलात्कार पीडीतेला गर्भापात करण्यास बॉम्बे हाय कोर्टाची परवानगी

एका व्यक्तीने ट्विटर हॅंडलवरून सदर घटनेचा व्हिडिओ शेअर केला आहे. तसेच महाराष्ट्रात कोणाचीही करणे ही साधरण गोष्ट झाली आहे. लॉकडाऊनमध्ये सोशल डिस्टेंसिंग उल्लंघन केले जात आहे. तसेच भररस्त्यात कोणत्याही व्यक्तीवर तलवारीने वार करुन निघून जात आहेत, अशा अशायाचे ट्विट त्याने केले आहे. दरम्यान, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांनाही टॅग केले आहे.